सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने पुरस्कार वितरण संपन्न
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा तालुका सावंतवाडीचे शिक्षक सुर्यकांत अनंत सांगेलकर यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने नुकताच खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा तालुका सावंतवाडीचे शिक्षक सुर्यकांत अनंत सांगेलकर यांचा शाल-श्रीफळ व गौरवपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आला.वर्ष 2021 -22 साठी हा सन्मान करण्यात आला.
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा तालुका सावंतवाडीचे शिक्षक तथा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या वर्ष 1987-88 च्या बॅचचे विद्यार्थी सुर्यकांत अनंत सांगेलकर यांचा हा सन्मान त्यांनी, भारतीय संविधानाने घालून दिलेल्या आदर्शातून शिक्षणाच्या विकासासाठी जे शिक्षण दानाचे कार्य केले आहे, त्याबद्दल देण्यात आला आहे. सांगेलकर सर यांनी ते कार्यरत असलेल्या शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सक्षम , सशक्त आणि उत्तम नागरिक बनतील असा प्रयत्न केल्याबद्दल व तसा आशावाद बाळगून केलेल्या शिक्षण प्रकियेतील विकासात्मक कार्याबद्दल देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे “उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच हा पुरस्कार देण्यामागे सुर्यकांत सांगेलकर हे कार्य यापुढेही चालवतील व बलशाली भारत बनविण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून कार्यरत राहतील असा विश्वास बाळगण्यात आला आहे.
सुर्यकांत सांगेलकर यांना विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघ सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक संघाचे सचिव गजानन नानचे व कार्याध्यक्ष बी. बी. चव्हाण यांच्या स्वाक्षरीने हे सन्मान पत्र प्रदान करण्यात आले आहे.