रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांचे उपोषण स्थगित
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या बांदा ओटवणे कालव्याचे पाणी येत्या दि.१० मे पर्यंत रोणापाल गावात पोहचेल असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता श्री रोहित कोरे यांनी दिल्यानंतर रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण स्थगित करण्यात आले.
तिलारी पाटबंधारे प्रकल्प कार्यालय चराठा येथे रोणापाल गावचे सरपंच श्री सुरेश गंगाराम गावडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी उपोषणास सुरुवात झाली. गेले अनेक महिने तारीख पे तारीख देत तिलारी पाटबंधारे विभाग चराठे यांना वारंवार पत्र देऊनही त्याची दखल घेतली नव्हती. दि. १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी रोजी विलवडे, ओटवणे, इन्सुली, मडुरा, निगुडे, रोणापाल, सातोसे, पाडलोस आदी सरपंच, उपसरपंच यांना तिलारी पाटबंधारे विभागाने कार्यकारी अभियंता श्री. रोहित कोरे यांनी आपल्या स्वाक्षरीने दि. १५ मार्च २०२२ पर्यंत किमी ४२ पर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन आहे असे लेखी पत्र दिले होते. त्यानंतर १५ मार्च नंतर कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतल्यानंतर ३० मार्च ला पाणी सोडणार असे सांगण्यात आले परंतु पाणी सोडण्यात आले नाही म्हणून उपोषण छेडण्यात आले.
सरपंच संघटनेने सदर उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री प्रमोद गावडे तसेच वासुदेव जोशी (सरपंच नाणोस) , दिनानाथ कशाळीकर (सरपंच सातोळी) बावळाट , समीर गावडे (सरपंच, निगुडे) विजय वालावलकर उपसरपंच, मडुरा, गुरुदास गवंडे उपसरपंच, निगुडे भिकाजी केणी उपसरपंच रोणापाल, विलास सावंत (अध्यक्ष सिंधुदुर्ग फळ बागायतदार) उदय देऊलकर (माजी सरपंच रोणापाल) जगन्नाथ पंडित, प्रकाश वालावलकर (मा. ग्रामपंचायत सदस्य मडुरा) , अरुण पंडित,फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत नितीन मावळणकर, सुदीन गावडे आदीं उपस्थित राहून उपोषणास पाठिंबा दिला होता.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री रोहित कोरे यांनी येत्या १० मे पर्यंत रोणापाल गावात पाणी पोहचेल असे नियोजन केले आहे असे लेखी आश्वासन दिले त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले.

