कोकणसिंधुदुर्ग

तर आम्ही स्वबळावर लढण्याचा विचार करू…

 

अमित सामंत; आमच्या लढाईत तिसरा शक्तीचा फायदा नको

*सावंतवाडी ता.१९-:* नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल सर्वांनी पाहिला आहे मात्र आमच्याच मित्रपक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून अशी भूमिका मित्रपक्षांनी घेतल्यास आम्ही सुद्धा स्वबळावर लढण्याचा विचार करू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे दिली. येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात आज ई -श्रम कार्ड वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ते बोलताना पुढे म्हणाले की निवडणूक लढवताना आपल्याला बलाढ्य प्रति स्पर्धेशी लढायचे आहे. मात्र यात तिसर्‍या शक्तीचा फायदा व्हावा आणि नको ती शक्ती सत्तास्थानी बसावी याचे उदाहरण गेल्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी पाहिला असून याची पुनरावृत्ती होऊ नये अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!