जिल्ह्यात म्हाडा अंतर्गत होणार ५० बेडचे कोविड रुग्णालय
सावंतवाडी दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हाडा अंतर्गत ओरोस येथे ५० बेडचे सुसज्ज असे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड असलेले रुग्णालय उभारण्यात येणार असून, येत्या १० दिवसात हे रुग्णालय सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये रुग्ण संख्या कमी होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. सद्य स्थितीत रुग्ण संख्येत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. ही बाब चिंताजनक असून, यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष घालत म्हाडा अंतर्गत ओरोस येथे ५० बेडचे रुग्णालय येत्या १० दिवसात उभारण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाला आहे. अशी माहिती अमित सामंत यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी या रुग्णालयासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी शासनाला सादर केला होता. त्यानुसार हे रुग्णालय प्राप्त झाले आहे. तसेच यावेळी त्यानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले आहेत.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काका कुडाळकर, अशोक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.