न्हावेली ग्रामस्थांसहीत सावंतवाडी तालुकावासीयांना लाभणार आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे विचार ऐकण्याची संधी
श्री देव इसवटी कला क्रीडा मंडळ,न्हावेली(नागझरवाडी) यांच्या वतीने तीन दणदणीत दशावतार नाट्य कलाकृतींचा नाट्य महोत्सव
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
तीन दणदणीत दशावतार नाट्य कलाकृतीं पाहण्याच्या संधीबरोबरच महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून गौरव झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावाचे आदर्श सरपंच तथा राष्ट्रपतींच्या हस्ते दोनवेळा पारितोषिक मिळवणारे सरपंच भास्करराव पेरे- पाटील यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी न्हावेलीकरांबरोबर सावंतवाडी तालुका वासीयांना मिळणार आहे. श्री देव इसवटी कला क्रीडा मंडळ,न्हावेली(नागझरवाडी) यांच्या वतीने आयोजित दशावतार नाट्य महोत्सवात दशावतार नाट्य कलाकृतींबरोबरच
भास्करराव पेरे-पाटील यांचे “माझे गाव” या विषयावर अतुलनीय व अनमोल विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.
बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी न्हावेली येथे आयोजित करण्यात आलेल्या या दशावतार नाट्य महोत्सवात बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी रात्री 8.00 वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे यांच्या मार्फत तर गुरुवार दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 8.00 वाजता श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांच्या मार्फत व शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी रात्री 8.00 वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस यांच्या मार्फत दशावतार नाट्य कलाकृती सादर होणार आहेत. तसेच यावेळी बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा तर दुपारी 12.00 वाजता श्री आरती आणि तिर्थ प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर सायंकाळी 7.00 वाजता भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

