कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गतच्या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातून जिल्हास्तरीय स्पर्धेत उतरणारी निरवडे ग्रामपंचायत ठरली एकमेव ग्रामपंचायत…

 

सरपंच हरी वारंग यांच्या अभ्यासू व कार्यक्षम कारभाराचे यश

सावंतवाडी, दि.२२:-
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत उतरणारी सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.निरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सध्या हरी वारंग हे अभ्यासू व कार्यक्षम सरपंच विराजमान असून हरी वारंग यांनी हा बहुमान निरवडे गावाचा पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रभाग स्तरावरील बक्षिस व तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षिस निरवडे ग्रामपंचायतीला मिळाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी स्वच्छता बक्षीसही या ग्रामपंचायतीने मिळवले आहे.
निरवडे गावाला हा बहुमान सरपंच हरी वारंग यांनी एक महिन्यापुर्वी पदभार स्वीकारल्यानंतर गावात ग्रामस्वच्छतेचे नियोजन करुन मिळवून दिला आहे. यासाठी सरपंच हरी वारंग यांनी जिल्हा स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला असून गावाच्या स्वच्छतेचे हे काम गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून व त्यांच्या लोकवर्गणीतून रक्कम गोळा करून यशस्वीपणे केले आहे.यासाठी हरी वारंग यांनी गावात रंगरंगोटी करणे, रस्त्यांना नामफलक लावणे, गावातील शाळांना रंगरंगोटी करणे, गावात स्वच्छता कामे आदी कामे सुरु केली आहेत. यासाठी नुकतीच ग्राम स्वच्छता अभियान समिती स्थापन करण्यात आली असून
या ग्राम स्वच्छता अभियानाला ग्रामस्थांचे व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.
या सर्व कामातून हरी वारंग
यांची कार्यक्षमता दिसून येत असून या स्पर्धेतील कामांचे नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच सभा
आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी सरपंच हरी वारंग,उपसरपंच चंद्रकांत गावडे,सदस्य अर्जुन पेडणेकर, संदीप पांढरे, माजी सरपंच सदा गावडे, सौ. सुविधा गावडे, सौ. सावळ, सौ. बेंद्रे, सौ. निरवडेकर, धर्माजी गावडे आदी उपस्थित होते.
या ग्रामस्वच्छता अभियानाला ग्रामविकास अधिकारी मधुकर घाडी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.यावेळी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम येण्यासाठी जोमाने काम करण्याचा सरपंच हरी वारंग यांना शब्द दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!