एसटी कर्मचा-यांच्या आडून जीवघेणा हल्ला करणा-या ख-या गुन्हेगारांना शासन करावे-अर्चना घारे
*🎴सावंतवाडी, दि.०९:-* पवार साहेबांच्या घरावर हल्ला ही अत्यंत घृणास्पद आणि लाजिरवाणी घटना आहे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही म्हणून शरद पवार साहेबांच्या कुटूंबियावर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला खाली मान घालायला लावणारी ही घटना आहे. पण तरीही सुप्रिया ताई या हिंसक जमावाला खूप धैर्याने, संयमाने नि प्रगल्भतेने सामोरे गेल्या.
तत्परता दाखवून वेळीच हिंसक जमावास नियंत्रीत केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभिनंदन! राज्य सरकार ने या बाबत गुन्हा नोंदवून, सीआयडी मार्फत चौकशी करून एसटी कर्मचा-यांच्या आडून जीवघेणा हल्ला करणा-या ख-या गुन्हेगारांना न्यायालयाकडून शासन करावे. महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. तिला जपण्याचे काम आमचे नेते करत आहेत आणि म्हणुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संयमाने वागत आहेत. अन्यथा आम्हालाही जशास तशे उत्तर देता येऊ शकते असा इशारा अर्चना घारे यांनी दिला आहे.