१० ते १५ महाविद्यालयीन युवकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

 

सावंतवाडी, दि.०७:- शहरात आज सकाळी महाविद्यालयीन युवकांचा अपघात झाला त्यानंतर सावंतवाडीत वाहतूक पोलिसांनी महाविद्यालयात शिकणारे काही युवक विनापरवाना वाहन चालवताना आढळून आले आहे त्यानंतर त्वरित वाहतूक पोलिस राजा राणे,सुनिल नाईक,श्नी.साटेलकर यांनी तब्बल १० ते १५ विनापरवाना वाहन चालवणाऱ्या महाविद्यालयीन युवकांवर दंडात्मक कारवाई केली. गाडीचे मालक तसेच विनापरवाना चालवणारे युवक दोघावरही सावंतवाडी पोलिस स्थानकात नेत दंडात्मक कारवाई करण्यात आली व समज देऊन मुलांना सोडण्यात आले.
सावंतवाडी शहरात अनेक काँलेज चे युवक विनापरवाना गाड्या चालवत असतात मात्र वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नव्हती त्यामुळे ही मुले बिनधास्त पणे गाड्या चालवत होती मात्र आज अपघात घडताच वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.सायंकाळी सुद्धा तलावाकाठी धुमस्टाईल बाईक चालवत असतात,मोठे मोठे आवाज करत सुद्धा बुलेट सारख्या गाड्या दररोज तलावाकाठी फिरवल्या जातात त्यावरही सुद्धा वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी शहरावासियांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!