दारू धंद्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव करावेत

*🟥.दारू धंद्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव करावेत,*

*सावंतवाडी शहरातील नाक्या-नाक्यावर दारू तस्करांचे गुंडाराज*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 संपादकीय: सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:७ एप्रिल*
अवैद्य दारू धंद्यातून झटपट मिळणारा पैसा व कमी वयात आलेली श्रीमंती ,यामुळे नसानसात भिनलेलेली दादागिरी ,रस्त्यातून चालताना पण दिसून येते, अशाच या धंद्यात अजू, बाबू ,बाबा ,निलू ,अशी माणसे अफाट श्रीमंत झाली ती अवैध दारू धंद्यात उतरल्या मुळेच.
काही मुले दारूच्या पैशावर रस्त्यात सुद्धा धिंगाणा घालायला मागे पुढे पाहत नाहीत, हे अनेक वेळा दिसून आले आहे,श्री पंचम खेमराज महाविद्यालय समोरील मोकळी जागा हा दोन नंबर वाल्यांचा अड्डा बनला आहे,त्या ठिकाणी थांबून बक्कळ पैसा मिळवलेली ही मुले कॉलेज युवकांना हेरतात व आपल्या जाळ्यात ओढतात व कॉलेज युवकांना काही अडचण निर्माण झाल्यास ते दादांना ही गोष्ट सांगतात व त्यातून असे प्रकार घडतात, असाच एक प्रकार दोन दिवसापूर्वी हॉटेल मॅंगो टू च्या समोर घडला
कॉलेज युवकांची झालेली बाचाबाची एका मित्राने दारू धंद्यातील आपला मीत्र अजूला सांगितली व अजून आपले सैन्य गोळा करुन मॅंगो टू च्या समोर त्या मुलाला घेरले, समोरूनच येणाऱ्या एका पोलिसाच्या ही घटना निदर्शनास येताच त्याने त्या ठिकाणी थांबून घोळका करण्याचे कारण विचारले, त्यावेळी त्या युवकाने आम्ही थांबावे की नाही हा आमचा प्रश्न आहे तुम्ही विचारणारे कोण? असे सांगून पोलिसांची हुज्जत घालायला सुरुवात केली,अखेर त्या पोलीसाने त्याला पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याची मुक्तताही केली.
एकंदरीत हा जो प्रकार घडला ही संघटीत गुन्हेगारी आहे, मुळात एवढी मिजास या मुलांमध्ये आली तरी कशी? कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांना समजले जाते व त्यांचा आदरयुक्त धाक नागरिकांमध्ये असला पाहिजे असे आपण मानतो,त्याच पोलिसां समोर भर चौकात उद्धट वर्तणूक करून त्याच्या अंगावर धावून जाण्याची हिम्मत या मुलांमध्ये कशी येते हा मोठा प्रश्न आहे? कारण ही मुले दोन नंबर धंद्यात असल्यामुळे त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे त्यामुळे पोलिसही त्या मुलांचे मींदे बनले आहेत, त्यामुळे त्यांना पोलिस यंत्रणा आपल्या खिशात असल्या सारखी वाटते व त्याचा त्रास प्रामाणिक पोलीसांना सहन करावा लागतो.
म्हणून बेकायदा दारू धंद्यातील दारू तस्कारांचा वेळीच बंदोबस्त होणे गरजेचे आहे, या ठिकाणी म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय याचे जास्त दुःख होतेय, सदरच्या धंद्यातील युवकावर आज पर्यंत झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपशीलवार आढावा घेऊन त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कोकण लाईव्ह न्युज चॅनलकडे अशा प्रकारची मागणी अनेक सामाजिक स़स्थातिल पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली आहे, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग व पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी आपापल्या विभागातील गुन्ह्यांची पडताळणी करून संबंधितावर तडीपाराचा प्रस्ताव तयार करावा व अशा प्रवृत्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*

*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*

शेवटचे काहीच दिवस शिल्लक

*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*

*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*

*👉फ्रीजवर कूलर फ्री*

*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*

*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*

*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*

(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)

*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.

मो. 9422055122
8983805122

*अटी व शर्ती लागू*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!