गोवा अमली पदार्थ विरोधी पथकाची सिंधुदुर्गात मोठी कारवाई हेच कोकण लाईव्ह चे यश
*🟥 गोवा अमली पदार्थ विरोधी पथकाची सिंधुदुर्गात मोठी कारवाई हेच कोकण लाईव्ह चे यश*
*🟥 गोव्यातील अमली पदार्थ विरोधी पथक येऊन सिंधुदुर्गात कारवाई करते मग राज्याचे अमली पदार्थ विरोधी पथक काय झोपा काढतेय*
*🟥 शासन करते व प्रशासन मुर्दाड म्हणून अमली पदार्थाचा सिंधुदुर्गाला विळखा*
*🟥भ्रष्टाचार, अमली पदार्थांचा घट्ट विळखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला असतानासुद्धा आमदार-खासदार पालक मंत्री निद्रिस्त*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:१४ मे*
सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवैध धंद्यांचा विळखा अशा प्रकारचे संपादकीय लिखान आम्ही वारंवार करून प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले, तेव्हा तथाकथित काही समाज सुधारकांनी नाके मुरडली, सीताराम गावडे एकटा काय करणार? त्याला कुठे काय मिळत नसेल म्हणून देत असेल? अशा प्रकारच्या चर्चा करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, मात्र ज्याच्या घरात अशा प्रकारचे अवैध धंद्यचे लोन पोहचतात त्यांनाच त्याची किंमत कळते, थोडक्यात काय तर स्वतःचा बाप मेल्याशिवाय रडायला येणार नाही, तशी अवस्था या काही तथाकथित समाजसुधारकांची झाली, यावर लिहिले पाहिजे,कोणीतरी उठाव केला पाहिजे, या मताचा मी असल्याने माझ्याकडून, एकट्या कडून काही होणार नाही हे माहिती असताना सुद्धा,याची कोणी तरी सुरुवात केली पाहिजे म्हणून हे शिवधनुष्य मी उचलले. हे शिव धनुष्य उचलल्यानंतर विविध क्षेत्रात अनेक शत्रू तयार झालेत, मात्र त्याची तमा न बाळगता परिवाराचा विचार न करता, मी याबाबत मागे वळून पाहिले नाही, अनेकांनी तडजोड करण्याचे प्रयत्न केले मात्र सगळ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरलेत,३६५ खेड्यांचा रखवालदार श्री देव उपरलकर श्री देव पाटेकर याच्या आशीर्वादाने मी लढा सुरूच ठेवला व आता या लढ्याला यश यायला सुरुवात झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सावंतवाडीत बेग नामक व्यक्तीकडून तीन किलो गांजा पकडला गेला तर गोव्यात शेख नामक व्यक्तीकडून तीन किलो,त्यानंतर काही जणांकडून दहा ग्रॅम ,वीस ग्रॅम ,गांजा पोलिसांनी पकडल्या ,या अगोदरही गेल्या सात आठ वर्षात सावंतवाडी शहरातील एका माध्यमिक विद्यालयात गांजा पकडला गेला, त्यावेळीही स्थानिक लोकप्रतिनिधी उठाव केला मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही ,त्यावेळीच जर मुळापर्यंत पोलिस पोचले असते तर आता हा अंमली पदार्थांचा घट्ट विळखा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पडला नसता असे आम्हाला वाटते.
अमली पदार्थ विरोधी पथकाने पेडणे मालपे येथे गांज्या ची विक्री होत असताना एकाला ताब्यात घेतले त्यानंतर यामागचा सूत्रधार ओटवणे येथील प्रवीण मयेकर याला ताब्यात घेण्यात आले, यातील मुख्य सूत्रधार हा वेगळाच आहे ,पैशाच्या लोभापायी तरुण मुले या धंद्याला बळी पडून आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत,त्यामुळे अमली पदार्थविरोधी पथकाने या अमलीपदार्थ पुरवठा करणाऱ्या च्या मुळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे,जर हे अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्यांचा मूळापर्यंत पोचले तर आणि तरच शपीक शेमन सारखी माणसे गजाआड होतील असे आमचे ठाम मत आहे, ज्याप्रमाणे पान स्टॉल वर विविध कंपनीच्या सिगरेट मिळतात तशाच प्रकारे आता गांजा चरस उपलब्ध होऊ लागला आहे व प्रत्येकाच्या घरापर्यंत याचे लोण पोहोचले आहेत,अनेक मुलांनी ऐन तारुण्यात नैराश्य पोटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे, आपल्या घरातला एकुलता एक मुलगा गेल्यानंतर आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो तो आम्ही पाहिला आहे, अवैद्य पैशाच्या जीवावर रस्त्यावर मारामाऱ्या करून अनैतिक संबंध ठेवून त्या महिलेचा मृतदेह दरीत फेकणारे हे आम्ही पाहिले आहेत, त्यामुळेही राक्षसी वृत्ती ज्याच्यामुळे निर्माण होते त्याचं समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे यासाठी आम्ही हा लढा सुरु ठेवला आहे.
या लढ्याला कोणी काहीही नाव देवो, कोणी काही म्हणो !त्याची आम्हाला पर्वा नाही, मात्र अंगात रक्ताचा एक थेंब असेपर्यंत मी हा लढा सुरू ठेवेन असा विश्वास या पाटेकर च्या भूमीत मी आपल्याला देत आहे, मी अनेकांना सांगतो प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांची आमची अवलाद नाही, आई-वडिलांच्या पुण्याइने शेतात खुर्ची टाकून बसलो तरी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो, त्यामुळे चुकीच्या मार्गाने आलेला पैसा मिळविण्यापेक्षा भाजी भाकरी खाऊन दिवस काढलेले बरे, त्यामुळे आमच्या कोणी भानगडीत पडू नये असा इशारा मी देत आहे.
. गोव्यातून येणारी चोरटी दारू, अमली पदार्थ, यावर मी वारंवार लिखाण केल्यावर अनेक जणांनी मांडवली चा प्रयत्न केला, माझ्याकडे जी काही चार पाच माणसे आलीत त्यांना मी एकच सांगितले की माझ्या वाड्यात ऐन तारुण्यात दारू पिऊन चार ते पाच युवक गेले आहेत, त्यांची कुटुंब उघड्यावर पडले आहेत,ै त्यांच्या बायका कशा जिवन जगतात ते मी पाहिले आहे,त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतरच दुःख काय असते ते तुम्ही अनुभव घ्या मेलेल्या त्या मुलांचा आत्मा परत घेऊन या, तरच मी हे सर्व बंद करेन असे ठामपणे सांगितल्यावर त्या लोकांनी त्या वेळी काढता पाय घेतला, त्या नंतर माझ्या कार्यालयात अशा प्रकारची मांडवळी करायची कोणी हिंमत केली नाही व करणारही नाहीत.
मी हा लढा उभारताना सर्व ताकदीनिशी मैदानात उतरलो आहे साम-दाम-दंड-भेद या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे, त्यामुळेच मी हे शिवधनुष्य उचलले आहे, त्यामुळे आपल्या विरोधात काही तरी छापून आले अथवा सीताराम गावडे यांनी एखाद्या दुसर्या विषयाला हात घातला म्हणून तो पहिला विषय बंद झाला, असे कधी होऊ शकत नाही मात्र ज्याचा विषय बाहेर काढला तो मात्र अशा प्रकारची बदनामी करू शकतो, त्याने या पाटेकरच्या पवित्र भूमीत अशा प्रकारची खोटी बदनामी केली तर त्याचे फळ पाटेकर निश्चितच त्याला देईल यावर माझा ठाम विश्वास आहे, आणि त्याचा कोणताही परिणाम माझ्या मनावर , लिखाणावर ,होणार नाही यांची मी हमी देतो,जे जे समाज विघातक असेल त्या त्या विरोधात मी लिखाण करणारच त्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.
. अमली पदार्थविरोधी पथकाने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्ष घालून समुद्र किनारपट्टी वरील गावे विविध प्रकारचे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची तेथील हॉस्टेलची तपासणी करावी ,कॉलेज युवकाकडे गांजा चरस येतो कुठून याच्या मूळापर्यंत जावे ,वृक्षाच्या मुळाशी घालावा म्हणजे फांद्या आपोआप खाली येतील असे आमचे अमलीपदार्थ विरोधी पथकाला आवाहन आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे मी मनापासून आभार मानून या पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लक्ष घालावे असे आवाहन करत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🏝️ माधवबाग🩺*
👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….
*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*
*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२
*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६
हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल
*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*
🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी
*📱संपर्क:*
*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581
*सावंतवाडी-*📱7774028185
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

