मडूरेत ३५ वर्षांवरील क्रिकेट स्पर्धेत गोठणेश्वर संघ विजेता

 

आई भवानी संघ उपविजेता

 

संजय भाईप/ सावंतवाडी

मडुरा येथील ३५ वर्षांवरील मडुरा प्रिमीअर लीजेंड क्रिकेट लीग २०२२ चे विजेतेपद गोठणेश्वर संघाने पटकाविले. आई भवानी वॉरीयर्स संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. बाबरवाडी येथील राजे शिवछत्रपती मैदानावर प्रथमच आयोजित लीजेंड क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मडुरा गावात प्रथमच ३५ वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन कोलझर हायस्कूलचे शिक्षक सुनील परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच विजय वालावलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे, माजी उपसरपंच उल्हास परब, सोसायटी चेअरमन संतोष परब, प्रकाश सातार्डेकर, रमाकांत धुरी, संघमालक नारायण मोरजकर, प्रमोद धुरी, हिराजी परब, दीपक घाडी, एकनाथ खर्डे, दाजी सातार्डेकर, तुषार धुरी, विनोद वालावलकर, योगेश तळवणेकर उपस्थित होते.

स्पर्धेत स्वामी माऊली, ए स्टार इलेव्हन, दक्ष लायन्स फायटर, माऊली बॉईज, गोठणेश्वर व आई भवानी वॉरीयर्स हे सहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दक्ष लायन्स व आई भवानी संघात झाला. यात आई भवानी संघ विजयी झाला. दुसरा उपांत्य सामना गोठणेश्वर व ए स्टार इलेव्हन संघात होऊन गोठणेश्वर संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम चुरशीच्या सामन्यात गोठणेश्वर संघाने विजय प्राप्त करुन विजेतेपदावर कब्जा केला. आई भवानी वॉरीयर्स संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोठणेश्वर संघ व उपविजेत्या आई भवानी संघाला चषक व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मालिकावीर रामदास शेळके, उत्कृष्ट फलंदाज दाजी सातार्डेकर व उत्कृष्ट गोलंदाज किशोर धुरी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ३५ वर्षांवरील खेळाडूंसाठी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने वरिष्ठ खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.

स्पर्धेत पंच म्हणून रवी पेडणेकर व सौरभ परब यांनी काम पाहिले. घनश्याम वालावलकर, प्रणव परब, प्रज्ञेश परब, अविनाश परब, गणेश सातार्डेकर, विनोद वालावलकर यांनी समालोचन केले. सुत्रसंचलन व आभार तुषार धुरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!