अर्थसंकल्पिय अधिवेशनात चिपळूण,गुहागर,खेड तालुक्याची विकासकामांत बाजी
🟥अर्थसंकल्पिय अधिवेशनात चिपळूण,गुहागर,खेड तालुक्याची विकासकामांत बाजी
🟥आ.भास्करराव जाधव यांनी उपलब्ध केला कोट्यवधींचा निधी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,७: नुकत्याच झालेल्या राज्याच्या
अर्थसंकल्प अधिवेशनात गुहागर विधानसभा मतदारसंघ,खेड,चिपळूण तालुक्याने विकास निधी मिळविण्यात बाजी मारली आहे. रस्ते, पाणी, पूल बांधकामसह विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा
निधी मंजूर झाला आहे तर समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या मच्छीमार समाजासाठी त्यांच्या राहत्या घराची
जागा आता त्यांच्या नावे होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासाठी आपण पाठपुरावा केला,
अशी माहिती आ. भास्करराव जाधव यांनी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अधिवेशन काळात कोकणातील संपूर्ण विधानसभा मतदार संघातील विधानसभा सदस्यांन मध्ये आ.जाधव यांनी सर्वाधिक निधी आणला असल्याचे बोलले जात आहे.
आ.जाधव पुढे म्हणाले की, साखरीआगर येथील जेटीसंदर्भात आपण सातत्याने
पाठपुरावा करत होतो. मात्र, त्यामधून ठोस कार्यवाही होत नसल्याने आपण अधिवेशनात अधिक आक्रमक झालो. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र बैठक घेऊन आ. भास्कर जाधव हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दिलेल्या आश्वासनानुसार मंगळवारी बैठक घेऊन आठ कोटी निधीची तरतूदही झाली. जुलैअखेरपर्यंत मंजूर निधी खर्च करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगितले. या अर्थसंकल्पात गुहागर मतदारसंघातील विकासकामांना भरभरून निधी मिळाला आहे. रस्ते व पुलासाठी २८ कोटी १६ लाख, २५-१५ योजनेतून १०० कोटीचा अधिकाचा निधी, पत्तन विभागातून पातशेत, वेळणेश्वर व वेलदूर येथील विकासकामांसाठी १० कोटी ४४ लाख मंजूर झाले आहेत तर कापरे येथील पाझर तलावासाठी १४ कोटी २८ लाख, संगलटव कॉडगांव येथे दिर्घकाळ रखडलेल्या तलावासाठी ३४ कोटी ८६ लाख, ग्रांग्रईतील तलावासाठी २३ कोटी, वावेत ३० कोटी तर मुसाड येथे ३२ कोटी खर्चाच्या निधीला मंजुरी मिळाली
आहे, काडवली, कांत्रोळी, कोकरे, कारूळ यांच्यासह तुरंबव-ढाकमोली येथील तलावकामांना प्रशासकीय
मंजुरी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी अनेक रस्त्यांचे ग्रेडेशन झाले असून ते राज्य मार्ग झाले
आहेत, जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून घराघरात पाणी मिळणार आहे. त्यासाठी खेड, चिपळूण व
गुहागर तालुक्यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. भविष्यात पर्यटन विषयक निधी खर्च करण्यासाठी नव्यायोजना आखण्यातयेतील.गुहागर बायपास रोडसाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आराखड्यानुसार
रस्ता होण्यासाठी आपण लवकरच ना. गडकरी यांची भेट घेऊ, असे सांगितले. त्याच पद्धतीने कोळकेवाडी
धरणातील पाणी ३६ गावाना देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला असून त्याचे तातडीने अंदाजपत्रक तयार करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपण पाठपुरावा
करीत असल्याचे आ. जाधव यांनी सांगितले.
———————————————
*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*
🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ मे🎀
पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ६९व्या वर्षानिमित्त
*_🚴♀️भव्य सायकल महोत्सव🚴♀️_*
_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_
_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._
🏃♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴♀️
● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.
*_~~🚴♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴♂️~~_*
◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
*💁🏻♂️ वैशिष्ट्ये :*
● योग्य दर. टिकाऊ माल.
● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध
● जीएसटी बिल मिळेल
● घरपोच डिलिव्हरी मिळेल
● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध
● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.
*_🚴♂️सायकल नेहमी चालवाआणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*
*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*📲93568836*
*📲931082828*
*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
सिंधुदुर्ग 416510
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_