कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवैध धंद्यांचा विळखा

*🟣संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवैध धंद्यांचा विळखा*

*🟣परराज्यातून आलेले झाले अल्पावधीत गब्बर- स्थानिक व्यापारी लागले देशोधडीला*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ संपादकीय :-सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-२३ नोव्हेंबर*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वीस वर्षात परराज्यातून आलेले काही व्यापारी, अवैध मार्गाने बक्कळ पैसा मिळून जिल्ह्याला चरस, गांजा ,अफू, ब्राऊन शुगर ,यासारख्या अमली पदार्थाचा विळखा घातला आहे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात युवा वर्ग व्यसनाधीन कडे वळून बरबाद होऊ लागला आहे, परराज्यातून आलेले दिवसेंदिवस अधिक गब्बर होत आहेत, यांच्या सारखा धंदा करणारे स्थानिक मात्र देशोधडीला लागले आहेत,इलेक्ट्रिक वस्तू, कापड धंदा याच्यातून एवढा बक्कळ पैसा मिळाला असता तर आमचे स्थानिक व्यापारीही अब्जाधिश झाले असते, मात्र सिंधुदुर्गात परराज्यातून व्यापाराच्या निमित्ताने आलेले हे घुसखोर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नशेली जिल्हा बनविण्याचे स्वप्न पाहत आहेत.
कॉलेज युवक- युवतींकडे गांजा सारखे नशीले पदार्थ मिळत आहेत, विशीच्या उंबरठ्यावरच असलेली युवक-युवती क्षणीक सुखासाठी आपले जीवन संपवत असताना सर्वपक्षीय नेतेमंडळी आळी-मिळी गुपचिळी म्हणून गप्प बसले आहेत, हा प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे, हे लोण स्वतःच्या घरात येतील त्यावेळची याची गंभीरता समजेल व त्यावेळी वेळ गेलेली असेल,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अकरावी बारावीत शिकणारे विद्यार्थी गांजा ,चरस ,यासारख्या धंद्यात उतरुन पुरवठा करण्याचे काम करून स्वतःही नशेच्या आहारी जात आहेत ,याबाबत आम्ही वारंवार लिखाणही केले, मात्र समाज प्रबोधन करण्याचे काम एकट्याचे काम नाही हे माहिती असूनही आम्ही या कामात खारीचा वाटा उचलत आहोत, आर्यन खान कडे अमली पदार्थ मिळाला नाही तरीही तो पंधरा दिवस जेलमध्ये राहिला, मात्र सिंधुदुर्गात शेख नामक व्यक्तीकडे तीन किलो गांजा सापडूनही तो सात दिवसात बाहेर आला, म्हणजे पोलीस यंत्रणा किती चोखपणे काम करते हे यावरून दिसून येते, ज्याच्याकडे सोळा ग्रॅम गांजा मिळाला तो मुख्य आरोपी व ज्याच्या कडे तीन किलो गांजा मिळाला तो विक्रेता हा पोलिसांचा अजब न्याय.
माझे तर असे म्हणणे आहे की प्रत्येक पोलिस स्टेशनच्या स्थानिक पोलिसांना हे अमली पदार्थ कोण विकतो, त्याची खडानखडा माहिती आहे,त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल नंबरही उपलब्ध आहेत त्यामुळे ही मुले बिनधास्तपणे आपल्या भागात हा धंदा करतात, या धंद्याचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या विक्रेत्यांना पकडण्यापेक्षा वृक्षाच्या मुळाशीच घाव घातला म्हणजे फांद्या आपोआपच खाली येतील.
त्याचा मुख्य म्होरक्या जो कोण आहे त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे ,गुजरात सारख्या राज्यातून अशाप्रकारे अवैद्य तस्करी महाराष्ट्र राज्यात होत असेल तर याकडे महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, गुजरातमधून आलेल्या प्रत्येक व्यापार्‍यावर गुप्तचर यंत्रणेने करडी नजर ठेवणे गरजेचे आहे, तरच या प्रकाराला आळा घातला जाईल, म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय त्याचे दुःख. हे काॅलेज युवक एकांतात निर्मनुष्य ठिकाणी अशा प्रकारच्या नशील्या पार्ट्या होत असतात व त्यात लाखो रुपयांची उलाढाल केली जाते ,या प्रकारामुळे नवयुवक बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे याकडे गांभीर्य पणे पाहणे गरजेचे आहे.

*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!