गांजा प्रकरण सर्वच राजकीय पक्षांसाठी अवघड जागेचे दुखणे*
*_🛑 कोणाचा भाऊ,कोणाचा पुतण्या तर कोणाचा सेवक, तर कोणाचा पदाधिकारी गांजा प्रकरणाशी निगडित*
*🛑सर्वच पक्षांची आळी-मिळी गुप-चिळी,तुझ माझ जमेना व गांजा शिवाय करमेना अशी परिस्थिती*
*🛑काळा गॉगल काढून घेऊन खरा चेहरा जनतेसमोर आणणे गरजेचे*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:१ ऑगस्ट*
सावंतवाडीत गाजत असलेल्या गांजा प्रकरणात धनदांडग्या व्यक्तींची मुले औसापडली नसती व त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाची संबंध नसता तर या गांजा प्रकरणात सावंतवाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या असत्या, मात्र सगळ्यांचे हात दगडाखाली असल्याने आळी-मिळी गुप-चिळी असा प्रकार सध्या सुरू आहे. बोलणार कोण? आपलेच दात आपलेच ओठ असा प्रश्न निर्माण झाला आहे,या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतो असे सांगणारे राजकीय पदाधिकारी दुसऱ्या दिवशी कोलांटी उडी मारून आधी काय घडते ते पाहू नंतर बोलतो असे सांगून पळवाटा शोधत आहेत.
गांजा प्रकरणात विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी त्यांचे नातेवाईक, भाऊबंद ,गण्या ,राजू, नासू,वासू,बाब्या , झिपऱ्या, पपू,आबू,शिब्या,अशी टोपण नावे असणारी वजनदार माणसे या प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणात कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेऊ शकत नाही, मात्र सावंतवाडीचे नाव बदनाम होऊ नये म्हणून आम्ही गप्प आहोत असे सांगून हे सर्वजण गप्प बसले आहेत .
सावंतवाडी शहर हे अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडून नष्ट झाले तरी चालेल पण बदनामी होता कामा नये ,म्हणजेच यापूर्वी सावंतवाडीत बदनामी करणारे काहीच घडले नाही असे असावे, याच सावंतवाडीने या पूर्वी पंधरा- वीस हजार लोकांचा मोर्चाही पाहिला आहे, सावंतवाडी शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, वारसा ,आहे हे आम्ही मान्य करतो, म्हणून या शहरात असे प्रकार घडू नयेत ,त्याचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठीच आमचा हा उठाव आहे, मात्र या ठिकाणी कुंपणच शेत खाते त्याठिकाणी न्याय तरी कोणाला मागणार असा प्रश्न सध्या आमच्या समोर उभा आहे, काही जण म्हणतात तुम्ही एकटे लढून काही होणार नाही ,जनतेला काही देणे घेणे नाही ,मात्र असे आपण प्रत्येकाने म्हटले तर हे अंमली पदार्थाचे लोण आपल्या घरापर्यंत पोहचायला वेळ लागणार नाही.
परराज्यातून घुसखोरी करून सावंतवाडी शहरातील एका वस्तीला अमली पदार्थांचे केंद्रबिंदू बनू पाहणाऱ्या त्या;नापीक लोकांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे या घुसखोराने काळा गॉगल घालून आपला वावर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा ,गोवा राज्यात ठेवला असला तरी त्याचे काळे गॉगल उतरवून त्याचा खरा चेहरा जनतेसमोर आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांची साथ असणे गरजेचे आहे, राजकीय नेतेमंडळी ,पोलीस प्रशासन, यांनीही या प्रकरणात हात देणे गरजेचे आहे, मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीही कॉलेज युवकांकडून सावंतवाडी शहरातील अज्ञात स्थळी अनेक वेळा गांजा पकडला गेला मात्र त्यावेळी तडजोड करून त्यांना सोडून देण्यात आले, त्यामुळे येथील स्थानिक पोलिसांना गांजा विक्री करणारी मुले कोणती, ती कुठे राहतात ,याची खडानखडा माहिती आहे असे आमचे मत आहे, झटपट श्रीमंत होण्यासाठी या अवैध मार्गाचा त्या मुलांनी अवलंब केला आहे,आणि त्यातून त्यांच्याकडील पैसा ओरबडून घेण्याचा प्रयत्न भ्रष्ट पोलिस करीत आहेत, त्यांची नावे बाहेर येण्याची गरज आहे आणि याबाबतची माहिती आम्ही गोळा करत आहोत ,त्यातून सत्य काय ते लवकरच समोर येईल पण आम्ही कधी हवेत बाण मारत नाही आणि ती आम्हाला सवय पण नाही सवंग लोकप्रियतेसाठी खोटे पसरून ते खरे आहे हे भासविण्याची आमच्यावर कधीच वेळ आली नाही, ज्यावेळी अशी वेळ येईल त्यावेळी सर्व बंद करून आम्ही घरी बसू मात्र सत्याची कास कधीही सोडणार नाही हे या निमित्ताने सांगू इच्छितो.
या प्रकरणी मी अनेक राजकीय पदाधिकारी ,नेतेमंडळी, यांच्याशी संपर्क साधून गांजा प्रकरणाचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले, बेकार ,बेरोजगार, युवकांना नोकरी नसल्यामुळे ते या धंद्याकडे ओढले गेले आहेत ,झटपट श्रीमंत होणे ,महागड्या वस्तू वापरणे, मौजमजा करणे, यासाठी या पैशाचा वापर केला जातो ,अशी मुले पालकांनाही जुमानत नाहीत,आपली मुले काहीतरी जीवाचे बरे वाईट करतील या भीतीने पालकही त्यांना घाबरतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे अशा व्यवस्थेत अडकलेली मुले म्हणजे पालकांचे अवघड जागेचे दुखणे आहे, महाविद्यालयात, अकरावी-बारावीच्या मुलांकडे ज्यावेळी गांजा पकडला जातो, त्यांच्या बॅगमध्ये सिगारेटची पाकिटे मिळतात, त्या वेळी शिक्षकांचे डोकं सुन्न होतं आपली पिढी कोणत्या मार्गाकडे चालली आहे त्यातून त्यांना कसे बाहेर काढावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो ,मात्र त्यावेळी शिक्षक विचार करतो त्यांच्या आई-वडिलांनाच काही पडले नाही तर मी म्हणून का विचार करू व इथूनच खऱ्या अर्थाने मुलांच्या अध पतनाला सुरुवात होते, शाळा महाविद्यालयात मुलांना मार्गदर्शन करणारी शिबिरे घेण्यात येतात या शिबिरातून किती मुले बोध घेतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
गांजा अंमली पदार्थाचे लोण दूरवर पसरले आहेत हे आम्हाला माहिती आहे , प्रत्येक वाड्यातील मुले प्रकरणात आहेतच रिक्षावाल्यांची मुले असतील, हॉटेल व्यावसायिकाची मुले असतील किंवा राजकारण्यांचीहमुले असतील भाजी विक्रेत्यांची मुले असतील, उच्चभ्रू समाजातील मुले असतील, या सर्व मुलांना या विषारी विळख्यातून बाहेर काढायचा असेल तर याच्या म्होरक्याक्या पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे ,नाहीतर पुन्हा तोच प्रकार काही दिवसांनी सुरू होणार आहे हे निश्चित, आम्ही पहिल्याच लेखात म्हटले होते की वृक्षाच्या फांद्या तोडत बसण्यापेक्षा त्याच्या मुळाशीच घाव घाला म्हणजे फांद्या आपोआप खाली येतील, तपास अधिकाऱ्यांनी वृक्षाचे मूळ शोधावे त्याला घाव घालावा म्हणजे फांद्या तोडत बसायला लागणार नाही व या प्रकरणाचे समूळ उच्चाटन होईल.
*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_कोणाचा भाऊ तर कोणाचा पुतण्या तर कोणाचा पदाधिकारी या गांजा_ धंद्याशी संबंधित.. एकंदरीत सर्वांचेच हात दगडाखाली*

- *🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
खरोखरच तुमच्यासारखे प्रामाणिक पत्रकार आहेत याचा
आम्हाला अभिमान वाटतो तुमच्या प्रयत्नाना नक्कीच
पाटेकरदेव व उपरलकरदेव यश देतील .
तुमचे असेच सत्यवादी काम चालू ठेवा आणि लोकांना न्याय देण्याचे काम करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत.