कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रवादी तर्फे मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ची मोफत सुविधा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरात ‘मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ची मोफत सुविधा शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १९ मार्च ते २७ मार्च पर्यंत स. १० ते सायं. ५ वाजेपर्यंत श्रद्धा सदन उभाबाजार सावंतवाडी इथं ही सुविधा उपलब्ध असणार असून याचा शुभारंभ आज करण्यात आला. यात शहरवासीयांना मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केल आहे.

तर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रविण भोसले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत सावंतवाडी विधनासभा अध्यक्ष अर्चना घारे परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, अफरोज राजगुरू, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, पुजा दळवी, सत्यजित धारणकर, इफतेकार राजगुरू कौस्तुभ नाईक हर्षद बॅग फैयाज शेख आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!