कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र्य पॅकेज द्या; विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
▪️रत्नागिरीतील अतिवृष्टीबाधित भागांची केली पाहणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रत्नागिरी
🎴रत्नागिरी,दि.२४: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे निकष बदलून कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीच्या वचनाची आता पूर्तता करावी अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.
मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. ठाकरे सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीची अपेक्षा असताना सरकारने बळीराजाला अतिशय तोकडी मदत दिली. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत ही शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे अशी टीकाही दरेकर यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पटवर्धन उपस्थित होते.
कोकणच्या दौ-यावर असलेल्या दरेकर यांनी आज रत्नागिरीमधील सोमेश्वरी पुलाची पाहणी केली, तसेच नेवली गाव, सोमेश्वर आणि चिंचखरी गावातील नुकसानग्रस्त भात शेतीची पाहणी केली, त्याचप्रमाणे लांजा तालुक्यातील कुवे आणि पन्हाळे गावालाही भेट दिली. तेथील शेतक-यांशी संवाद साधला.
कोकणवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अतिवृष्टीच्या मदतीसंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिका-यांसमवेत बैठक घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन शेतक-यांना मदतीच्या सूचना दिल्या.
कोकणातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. विरोधी पक्षांच्या दबावामुळे सरकारने किमान दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे, मात्र कोकणातील शेतकरी हा अल्पभूधारक असल्यामुळे जाहीर केलेल्या मदतीचा येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काहीच उपयोग होणार नाही असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारचे पॅकेज प्रत्यक्षात ९,७६० कोटींचे आहे, त्यामध्येही दोन हेक्टरीची मर्यादा घातली आहे. ठाकरे सरकारकडून जाहीर झालेल्या पॅकेजची पोलखोल करताना दरेकर म्हणाले की, पॅकेजमध्ये ३०० कोटी नगर विकास, २६०० कोटी रस्ते व पुल बांधणीसाठी, १०० कोटी जलसंपदा कामांसाठी, २३९ कोटी महावितरण व १ हजार कोटी ग्रामीण रस्ते व पाणी पुरवठा याकरिता वापरण्यात येणार आहेत. म्हणजे साडेपाच हजार कोटी शेती व घरांसाठी प्रत्यक्षात खर्च करण्यात येतील. कोकणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्याच्या वाट्याला ५० ते ५५ रुपये प्रति गुंठा मदत येणार आहे. म्हणजेच पाच ते दहा गुंठ्याला फक्त पाचशे ते हजार रुपये मिळतील असा अंदाज आहे, त्यामुळे ही तर येथील शेतकऱ्यांची अतिशय क्रूर चेष्टा आहे. नासाडीचे पीक बाहेर काढायलाच शेतकऱ्यांना सुमारे ५०० रुपयांचा खर्च येणार आहे, याचाच अर्थ शेतक-यांच्या हातात काहीच राहणार नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात सत्तेवर असलेल्या ठाकरे सरकारला कोकणाने भरभरून दिले. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून, तालुका, जिल्हा परिषद, आमदार-खासदार, व मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच सत्तास्थाने शिवसेनेला मिळाली. त्यामध्ये कोकणाच्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे. सरकारचे प्रमुख म्हणून कोकणाला विशेष पॅकेज किंवा शेतकऱ्यांसाठी वेगळी भूमिका घेणे हे या सरकारकडून अपेक्षित होते, परंतु महाविकास आघाडी सरकारचे खास करून शिवसेनेचे कोकणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, ही कोकणवासीयांची खंत आहे. त्यामुळे कोकणासाठी सध्या जे निकष आहे ते बदलून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे अशी आमची मागणी असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
कोकणात प्रामुख्याने भात शेती केली जाते. एकदा पीक नष्ट झाले तर शेतकऱ्यांचे सर्वस्व संपून जाते. त्यासाठी विशेष धोरण तयार करण्याची आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. कोकणातील चिंचखरी येथे सामुदायिक शेती केली जाते. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था तयार केली आहे. केंद्र शासन व राज्य सरकारकडून गट शेतीला प्रोत्साहन देण्यात येते, परंतु याठिकाणी शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाची कल्पना नाही. येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारीही याबाबत अनभिज्ञ आहेत. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून गट शेतीसाठी एक अभियान राबवून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे असे प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहीतीही दरेकर यांनी दिली.
शेतकऱ्यांचे पिक कर्ज पूर्णपणे माफ करावे अशी आमची मागणी आहे. पिक कर्ज माफ झाले नाही तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही. पावसामुळे जमीन उद्ध्वस्त झाली आहे. या जमिनीवर जे कर्ज आहे ते कर्ज फेडले नाही तर पुन्हा त्यांना कर्जही मिळणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे. याव्यतिरिक्त निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाईही लवकरात लवकर मिळावी, तसेच रत्नागिरी पाणीपुरवठा योजना व कोकणातील विविध विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयांचा पाठपुरावा देखील करण्यात आल्याचे दरेकर यांनी सांगितले.
खेड,संगमेश्वर,रत्नागिरी,राजापूर,लांजा याठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून यापैकी सुमारे ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. त्यामुळे आता पंचनाम्याच्या फेऱ्यात न पडता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी. पाचशे- शंभर रुपये देऊन शेतकऱ्यांची मदत होणार नाही. कोकणातील शेतकरी हा संयमी आहे त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. तो कधीच आत्महत्या करत नाही. राज्य सरकाने कोकणवासियांकडे दुर्लक्ष केले असले तरीही भाजप नेहमीच कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे,असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_