सिंधुदुर्गात चोरटी वाळू वाहतूक अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आशिर्वादानेच; माजी आ.परशुराम उपरकर

▪️अवैध वाळू वाहतूकीविरोधात उद्या जिल्हा मुख्यालयात आंदोलन छेडणार; उपरकर यांची माहिती

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०९: महसूल अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू व्यवसाय सुरू राहिला आहे. या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची मोठी दुर्दशा होत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना, वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूकीविरोधात उद्या दिनांक १० रोजी जिल्हा मुख्यालयात आंदोलन छेडणार आहोत. अशी माहिती मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज दिली. उपरकर यांनी आज येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, जिल्ह्यातील अवैध वाळू उपसाबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला, तक्रारी केल्या. त्यानंतर महसूल विभागाने काही ठराविक रॅम्प तोडण्याची कारवाई केली. मात्र, अजूनही अनेक नदी, खाड्यांमध्ये अवैध वाळू उपसा आणि अवैधपणे वाळूची वाहतूक होत आहे. अवैध वाळू वाहतूकीमुळे प्रमुख तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडत आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील वाळू साठ्यांचा अद्यापही लिलाव झालेला नाही. शासनाने जाचक अटी कायम ठेवल्याने लिलाव प्रक्रिया सुरू होत नाही. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूक अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आशिर्वादाने सुरू आहे. याखेरीज शासनाला देखील लाखोंच्या रॉयल्टीला मुकावे लागत आहे. याविरोधात आवाज उठविण्यासाठी उद्या दिनांक १० रोजी जिल्हा मुख्यालयात आम्ही आंदोलन करणार आहोत, असे देखील उपरकर म्हणाले.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!