कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

एस.टी. कामगार संघटना २ नोव्हेंबर  रोजी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴 कणकवली,दि.२४: कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एस.टी. कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने प्रचंड असंतोष वाढलेला आहे . दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकीत वेतन महागाई भत्याची थकबाकी, शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सण उचल मिळावी. या मागणीसाठी मान्यता प्राप्त कामगार संघटनेचे पदाधिकारी सर्व पातळीवर शासनाचे लक्ष वेधनार आहेत. एस.टी. कामगारांना वेतन मिळण्यासाठी २ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देणार आहेत. तसेच सर्व लोकप्रतिनिधीना एस.टी.कामगारांना लवकरात लवकर वेतन मिळावे यासाठी निवेदन देतील. तरी सुद्धा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एसटी कामगार आपल्या राहत्या घरासमोरस्वतःच्या कुटूंबियांसह ९ नोव्हेंबर रोजी वेतन मिळावे या मागणीसाठी आक्रोश व्यक्त करतील असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात शासनाने अंतिम इशारा दिला आहे. कोरोना विषाणूच्या महामारीत एस.टी.कर्मचारी जीवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करीत आहेत . लॉक डाऊनच्या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार परराज्यातील मजूर यांना थेट त्यांच्या राज्यात सोडण्याची कामगिरी एस.टी.ने पार पाडली.असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची वाहतूक तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एस.टी.कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत . यामध्ये महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोनाबाधित झालेले असून सुमारे ७३ कर्मचारी मृत झालेले आहेत . अशा कर्मचा-यांपैकी बहुतांशी कर्मचा-यांच्या कुटूंबियांना अद्याप विमा कवचाची रू .५० लाखांची मदत प्रशासनाने दिलेली नाही . कोरोना कालावधीमध्ये कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही त्यांना माहे ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही .

प्रशासनाने माहे जुलै २०२० या महिन्याचे वेतन दि .७ ऑक्टोबर २०२० रोजी देताना प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कपात केल्यामुळे एक महिन्याचे वेतनही अल्प प्रमाणात दिलेले आहे . त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . शासनाच्या आदेशांचे पालन करून कोरोनाशी दोन हात करणा-या या कोरोना योद्यांना ज्यावेळी वेतन दिले जात नाही त्यावेळी त्यांनी आपला प्रपंच कसा चालवावा हाच मोठा प्रश्न कामगारांसमोर निर्माण झालेला आहे . प्रशासनाने जुलै महिन्याचे वेतन ऑक्टोबर मध्ये दिले असले तरी माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२० चे वेतन कामगारांना अद्याप मिळालेले नाही . तसेच माहे ऑक्टोबर २०२० चे वेतनही लवकरच देय होणार आहे . याशिवाय शासकीय कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्ता व सण उचल देण्याची कामगार करारात तरतुद असतानाही सदर तरतुदीची रा.प.प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही . शासकीय कर्मचा-यांना वाढीव ५ टक्के महागाई भत्ता डिसेंबर २०१९ देय जानेवारी २०२० च्या वेतनापासून लागू केलेला आहे . परंतु सदरचा वाढीव ५ टक्के महागाई भत्ता एस.टी.कामगारांना अद्याप लागू केलेला नाही . तरी सदरचा वाढीव ५ टक्के महागाई भत्ता माहे ऑक्टोबर २०२० च्या वेतनापासून लागू करण्यात यावा.

तसेच महागाई भत्याची सन २०१८ मधील २ टक्क्याची तीन महिन्यांची थकबाकी , सन २०१ ९ मधील ३ टक्क्याची नऊ महिन्यांची थकबाकी व सन २०२० मधील ५ टक्क्याची १० महिन्यांची थकबाकीही कामगारांना अद्याप मिळालेली नाही . याबाबत संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे . मात्र प्रशासनाने सदरचा थकीत महागाई भत्ता रा.प.कामगारांना कामगार कराराच्या तरतुदीनुसार अद्याप दिलेला नाही . त्यामुळे कामगारांमध्ये याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे . एस.टी.कर्मचा – यांना त्यांनी केलेल्या कामाचे नियत देय तारखेस वेतन देण्याची जबाबदारी कायद्याने एस.टी.प्रशासनाची असतानाही प्रशासनाकडून एस.टी.कामगारांना नियत देय तारखेस वेतन दिलेले नाही . सध्याच्या एस.टी.च्या बिकट आर्थिक परिस्थितीस कामगार जबाबदार नाहीत .तरीही त्यांना वेठीस धरले जात आहे.
कामगारांना थकीत वेतन , थकीत महागाई भत्ता व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कामगारांना प्रशासनाविरोधात तीव्र संघर्ष करावा लागेल .

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!