पालकांनी पाल्यांना सांभाळा; मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर
▪️राजकारणी, लोकप्रतिनिधी, पोलिसांनी एकत्र येऊन भावी पिढीला वाचवावे; उपरकर यांचे आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचीची खरेदी विक्री सुरू आहे. गोव्यावरून सावंतवाडी व तेथून संपूर्ण जिल्ह्यात या अमली पदार्थांचे जाळे विणले गेले आहे. अनेक तरुण-तरुणी या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. तसेच काही लोकप्रतिनिधीही मटका जुगारचे काम करत आहेत. त्यासाठी बेरोजगार तरुणांचा वापर केला जात असून अवैद्य दारू धंद्यातही ही अनेक तरुण गुंतलेले आहेत. या साऱ्या बाबत पक्षीय राजकारण न करता पालक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, पोलिसांनी एकत्र येऊन भावी पिढी वाचवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. हे मध्यंतरी हेरोइन कनेक्शन असलेल्या काहींना अटक झाली होती. मुंबईत आत्महत्या केलेल्या सुशांत सिंग राजपूत या प्रकरणातील अमली पदार्थांची लिंक गोव्याची आहे. सिंधुदुर्गमध्ये ही याच गोव्याच्या लिंकमधून अमली पदार्थ जिल्ह्यात येतात. कुडाळ एमआयडीसी एरिया तसेच हायवे वरील एका स्वाॅमिलच्या पाठीमागे तरुण-तरुणी एकत्र जमतात. या अमली पदार्थांच्या आहारी जाणार ही पिढी वाचविण्याची गरज आहे, असेही उपरकर यांनी म्हटले आहे. या अमली पदार्थांच्या अमलाखाली कुडाळमध्ये फंड पेटी फोडण्याचा प्रकार घडला. भविष्यात घरफोडी बलात्कार असे प्रकारही यातून घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आपली पाल्ये काय करतात? कुठून पैसे आणतात? रात्री-अपरात्री कुठे फिरतात? याबाबत पालकांनी दक्ष असणे गरजेचे आहे. गोव्यावरून सावंतवाडीत येणाऱ्या अमली पदार्थ मध्ये एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत. त्यातील एक व्यक्ती ती गोव्यातील स्टॉलवरून दिवसाला चार चार वेळा जाऊन येतो. त्याच्याकडे मोठ्याप्रमाणात माया गोळा झालेली आहे, अशी संपूर्ण सावंतवाडीत चर्चा आहे अशाच प्रकारे तरुण अवैध मटका जुगार यात गुंतलेले दिसतात. जिल्ह्यात काही लोक प्रतिनिधी मटका, जुगाराचे काम करत आहेत. झटपट पैशासाठी ते या तरुणांचा वापर करतात. यातून काही तरुण व्यसनांच्या मोठ्या प्रमाणात आहारी जात आहेत. सिंधुदुर्गात मुंबईहून आलेले काही बेरोजगार व स्थानिकही या दारू धंद्यात मोठ्या प्रमाणात गुंतले आहेत. जिल्ह्यात अवैध दारू ची होणारी वाहतूक गावा गावा पर्यंत पोहोचली आहे. ऑनलाईन कॅसिनो मध्ये हे यापूर्वी अनेकांचे पैसे गेले. या नादाला लागलेले काही तरुणांनी घरफोडी केल्याचे आपणास माहीत आहे. याबाबत पक्षपातळीवर आवाज उठविला असला, तरी जिल्ह्यातील ही तरुण पिढी वाचविण्यासाठी कोणतेही राजकारण न करता पालक, लोकप्रतिनिधी, पोलिसांनी एकत्र येण्याची गरज आहे. पोलिसांना आज कदाचित सहज पैसे मिळतात असे वाटत असले तरी त्यांचीही मुले भविष्यात अडकू शकतात. त्यामुळे भावी पिढी वाचवण्यासाठी आत्तापासूनच सर्वांनी प्रयत्न केले,तरच ही पिढी वाचेल असेही उपरकर यांनी म्हटले आहे.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

