बांदा आळवाडा परिसरातील डिपी बॉक्स उंच भागात बसविण्याची मागणी महावितरणकडून मागणी मान्य
*🛑बांदा आळवाडा परिसरातील डिपी बॉक्स उंच भागात बसविण्याची मागणी महावितरणकडून मागणी मान्य*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴बांदा :२६फेब्रवारी*
बांदा आळवाडा येथील महावितरणच्या डीपी बॉक्स जागा बदलण्याच्या ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांच्या मागणीला यश आले आहे. पावसाळ्यात आळवाडा येथील डीपी बॉक्स सातत्याने पुराच्या पाण्याखाली येत असल्याने या भागातील नागरिकांना वीज समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. पोलीस स्टेशन परिसरात पर्यायी डिपी बॉक्स बसविण्याची कार्यवाही लवकरच करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.
बांदा – आळवाडा परिसरातील महावितरणचा डिपी बॉक्स पावसाळ्यात सातत्याने पुराच्या पाण्याखाली राहतो. सदर डिपी बॉक्स पोलीस स्टेशन आवारात उंच भागात बसविण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांनी महावितरणकडे केली होती. या पार्श्वभूमीवर कनिष्ठ अभियंता एस. आर. कोळे यांनी नुकतीच वस्तुस्थितीची पाहणी केली. या भागातील वीज ग्राहकांसाठी पोलीस स्टेशन परिसरात नवीन डिपी बॉक्स बसविणे आवश्यक असल्याचे अभियंता कोळे यांनी मान्य केले. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून लवकरच नवीन डिपी बॉक्स बसविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, सामाजिक कार्यकर्ते विलास आळवे, सुनील धामापूरकर, देवेंद्र भोगटे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बाजारपेठ येथील सुनील येडवे यांच्या दुकानच्या बाजूला असणारा विदयुत पोलवरील डीपी बॉक्स बदलावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_