बँ नाथ पै सेवांगण मालवण यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीचा हात
बँ नाथ पै सेवांगण मालवण यांच्या माध्यमातून आज बांदा, इन्सुली, शेर्ले, निगुडे येथील तब्बल 250 पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. सध्यस्थितीत आमच्याकडे पाणी सुद्धा नाही अश्या परिस्थितीत तुम्ही योग्य वेळात मदत केली आम्ही सदैव तुमची मदत विसरणार नाही असे उदगार पुरग्रस्तांनी काढले. तर आम्ही अजून काही मदत लागल्यास आम्हांला सांगा आम्ही ती पण देऊ असे सेवागण मार्फत सांगण्यात आले.
बांदा परीसरात पुरामुळे मोठी हानी झाली.त्या पाश्वभूमीवर बँ नाथ पै सेवांगण च्या वतीने मदतीसाठी आवाहन केले होते. मालवण, सावंतवाडी जिल्ह्यातील विविध भागातून अवघ्या दोन दिवसात जीवनावश्यक वस्तू सेवांगण कडे जमा करण्यात आल्या. यात चटई, बॅग, तांदूळ, बिस्कीट, मेणबत्ती, कोलगेट, क्रोसीन गोळ्या, पाणी बॉटल, आटा, कडधान्य, आदी सामानाची सुमारे पंधरा किलोची बॅग सेवांगणच्या सदस्यानी एकत्र करून आज वितरण केल्या.
यामध्य बांदा 42, शेर्ले, 53, निगुडे 13, इन्सुली कुडवटेम्ब 54, धुरीवाडी 49, बिलेवाडी 13, सावंतटेम्ब 12 आदी ठिकाणी अश्या एकूण अडीचशे जणांना हे वाटप करण्यात आले.
यावेळी सेवांगणचे सेक्रेटरी लक्ष्मीकांत खोब्रेकर, खजिनदार रुजारिओ पिंटो , कट्टा येथील श्याम पावसकर, संचालक ऍड संदीप निबाळकर, ऍड पी.डी. देसाई, हेमा अवसरे- देसाई, बाबा रखांंगी, संजय आचरेकर , रवींद्र बागवे, धर्माजी कांबळे, राज जाधव, नेहा निंबाळकर, संतोष तोरसेकर, सिद्धेश सावंत, ऍड रवींद्र कांगारलेकर, तेजस मेस्त्री, मंगल कामत आदी सेवांगणचे सदस्य उपस्थित होते.