‘मी सावरकर ‘ वक्तृत्व स्पर्धेत प्राध्यापिका संगीता जोशी यांचे सुयश
🛑’मी सावरकर ‘ वक्तृत्व स्पर्धेत प्राध्यापिका संगीता जोशी यांचे सुयश
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,ता.२३- व्हॉट्सअपद्वारे जागतिक स्तरावर घेतल्या गेलेल्या ‘मी सावरकर ‘ या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचे हे पाचवे वर्ष ! याहीवर्षी (२०२१-२२) वरिष्ठ गटात चिपळूणच्या सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. संगीता प्रमोद जोशी यांनी द्वितीय क्रमांकाचे रुपये ५०००/- चे पारितोषिक पटकावले. त्यामुळे चिपळूणमध्ये सर्वत्र त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. गेल्या वर्षीही त्यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते.
गेली पाच वर्ष या स्पर्धा घेतल्या जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत बाहेरील देशातील,सर्व राज्यातील स्पर्धक सहभागी होतात.ही स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून सहभागास खुली असते.या वर्षी वरिष्ठ गटात प्राध्यापिका संगीता जोशी यांनी ‘आज सावरकर असते तर….’ हा विषय बोलण्यासाठी निवडला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेते शरद पोंक्षे, श्री नितीश भारद्वाज, राहुल सोलापूरकर, प्रवीण तरडे, सौ. धनश्री लेले, कॅप्टन निलेश गायकवाड, योगेश सोमण, डॉ. श्रीरंग गोडबोले, सुनील अभ्यंकर, डॉ. प्रसाद पिंपळखरे, अरविंद रानडे, प्रकाश पाठक, विश्वास गांगुर्डे, अक्षय जोग, सौ. अश्विनी अंबिके, अॅड. सुशील अत्रे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय पुणेच्या अॅम्फी थिएटर येथे संपन्न होणार आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ले. जनरल विनोद खंडारे ( भूतपूर्व उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, भारत सरकार )उपस्थित राहणार आहेत . तर सुप्रसिद्ध अभिनेते, विचारवंत मा. योगेशजी सोमण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत.
प्रा.संगीता जोशी यांनी अनेकवेळा वक्तृत्व, कथाकथन, नाट्यवाचन, निबंध या स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. अनेक स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून त्या काम पाहतात. विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक आणि लेखिका म्हणून त्या परिचित आहेत.अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. सध्या सौ. संगीता जोशी या सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालयात सेवेत आहेत.त्यांच्या या सुयशाबद्दल चिपळूणमधील अनेकांनी त्यांचे कौतुक केले.
———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

