अडरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न- माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के
🟥अडरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न- माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के
🟥अडरे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात केले प्रतिपादन, पत्रकार संदेश पवार, उदय भोजने यांची प्रमुख उपस्थिती!
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,२६ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना खरी मदतीची गरज असते. माझी मातृभूमी असलेल्या या अडरे-वेहेळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी येथे केले. साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, वेहेळे ग्रामपंचायतीचे सदस्य रोहित गमरे, सामाजिक कार्यकर्ते उदय भोजने, भिम संघर्ष क्रीडा मंडळ वेहेळे यांच्या वतीने अडरे येथील पी.के. सावंत माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन अडरे हायस्कूल येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा इंदुलकर या अध्यक्षस्थानी होत्या. विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संदेश पवार, सामाजिक कार्यकर्ते उदय भोजने, ग्रा. प. सदस्य व क्रिडा प्रशिक्षक रोहित गमरे, विद्यालयातील शिक्षक दत्ताराम निर्मळ, जयप्रकाश खेडेकर, देविदास शिंदे, श्रीमती राजेशिर्के, सौ. जानवलकर, सौ. जाबरे यांच्यासह इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सुहास राजेशिर्के पुढे म्हणाले, अडरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे, मुंबई पुण्यातील तज्ञ मार्गदर्शकांना येथे बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. विद्यार्थ्यांना दहावी-बारावी नंतर पुढे काय? असा प्रश्न असतो, त्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. गोरगरीब, सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यावर आपला भर राहील असे सांगितले. तसेच यावेळी पत्रकार संदेश पवार यांनी मार्गदर्शन करताना प्रथमतः शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल सुषमा इंदुलकर यांचा भिम संघर्ष क्रीडा मंडळ वेहेळे यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
ते म्हणाले सुहास राजेशिर्के यांनी सातारा येथे अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या मायभूमीत देखील काम करण्याचा त्यांचा मनोदय पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रेरणादायी असा आहे. त्यांची ही तळमळ सर्वांना उभारी देणारी आहे असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सुषमा इंदुलकर यांनी आपल्या विद्यालयाने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. आपण बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत असताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले सुयश हे निश्चितच सर्वांना समाधान देणारे असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शाळेसमोरील वेगवेगळ्या शैक्षणिक समस्या सांगून ते सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित गमरे यांनी तर आभार प्रदर्शन जयप्रकाश खेडेकर यांनी केले. या कार्यक्रमास इयत्ता नववी व दहावीतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*
*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*
1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन
*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*
*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*
*🔰प्रवेश फी फक्त* – 5000
*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*
*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*
*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*
*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*
*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_