कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी सुनील राऊळ,तर सचिवपदी बाबली गवंडे

🛑सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी सुनील राऊळ,तर सचिवपदी बाबली गवंडे

🛑…तर सावंतवाडी-दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्षपदी संजय पिळणकर यांची निवड

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, ता२३ : “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग” या संस्थेची सावंतवाडी कार्यकारणीची सभा दि.२० फेब्रुवारी रोजी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेमध्ये संमत झालेल्या ठरावानूसार पुढील एक वर्षासाठी कार्यकारणीची पुनर्रचना करण्यात येऊन अध्यक्षपदी सुनिल राऊळ तर सचिवपदी बाबली गवंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी वार्षिक कार्याचा आढावा घेण्यात आला,नविन कार्यक्रमांचा कृती आराखडा तयार करण्यात आला,विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन व काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
संस्थेच्या घटनेला व जिल्हा कार्यकारणीच्या सभेतील ठरावांस अनुसरुन सावंतवाडी तालुका कार्यकारणीची फेररचना करण्यात आली,नवीन कार्यकारणी करताना काही अंशतः बदल करण्यात आले.
सावंतवाडी-दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष म्हणून संजय पिळणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.तालुका कार्यकारणीत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले.
नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे-
(अध्यक्ष) सुनिल राऊळ,(उपाध्यक्ष) दीपक तारी व मंगल कामत(सचिव) बाबली गवंडे(सहसचिव) अनिकेत सावंत(खजिनदार) सिद्धार्थ पराडकर
(सहखजिनदार)सुप्रिया मोडक
सदस्य संदीप चांदेकर,राकेश परब
निलेश मोरजकर,विद्याधर नाईक
हेमंत मराठे,तानाजी खोत,सौरभ पडते
रविंद्र तावडे,काका भिसे,जयगणेश गावकर याचबरोबर यावेळी संस्थेच्या जिल्हा सल्लागारपदी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक दयानंदजी गवस यांची तर तालुका कार्यकारणी सल्लागारपदी सुधीरजी पराडकर व आनंदजी वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली,आणि त्याबद्दल या तिघांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला,तर तालुका सचिव म्हणून चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळल्याबद्दल बाबली गवंडे यांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
जिल्हा सल्लागार दयानंदजी गवस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन व महत्त्वाच्या सूचना केल्या, नूतन तालुका अध्यक्ष सुनिलजी राऊळ यांनी मनोगत व्यक्त केले,तर जिल्हाअध्यक्ष प्रकाशजी तेंडोलकर तसेच जिल्हासचिव किशोरजी नाचणोलकर यांनी सर्वांचे अभिनंदन करुन सदिच्छा दिल्या.शेवटी सचिव बाबली गवंडे यांनी आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!