चिपळूण-कराड रेल्वेमार्गासाठी संघर्ष सुरूच..
गृहराज्य मंत्री ना.शंभूराजे देसाई यांच्याकडे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांची मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०५: कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण- कराड रेल्वे प्रकल्प महाविकास आघाडीने मार्गी लावावा,अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री ना.शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे. महत्वपूर्ण प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे चर्चा करण्याबरोबरच पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना.देसाई यांनी मुकादम यांना दिले कोरोना पार्श्वभूमीवर ना.शंभूराजे देसाई हे सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. रविवारी शौकत मुकादम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाटण येथील डेरवण गावी जाऊन ना.देसाई यांची भेट घेत चिपळूण-कराड रेल्वे मार्गाबाबत चर्चा केली. तसेच हा मार्ग दळणवळणासह येथील व्यापारी, उद्योजक सर्वसामान्य नागरिकांसाठी किती फायद्याचा आहे याकडेही त्यांचे लक्ष वेधले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते.मात्र सत्ता गेल्यानंतर केंद्रानेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. हा मार्ग व्हावा,यासाठी गेली कित्येक वर्षे पाठपुरावा सुरू आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध पक्षातील नेते चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्प मार्गी लावा लोकप्रतिनिधींकडेही या प्रकल्पाविषयी चर्चा केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या आघाडीने चिपळूण कराड रेल्वे मार्ग मार्गी लावावा. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन केंद्र तसेच राज्य शासनाचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घ्यावे, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली.
मुकादम यांनी या रेल्वे मार्गाबाबत वस्तुस्थितीची माहिती दिल्यानंतर ना.देसाई यांनीही चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे चर्चा करू. महाविकास आघाडीमार्फत हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही ना.देसाई यांनी आश्वासन दिले.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

