लोटे एक्सेल फाट्याजवळ गोवा बनावटीची दारू ११ लाख ६२ हजाराच्या मुद्देमालासह जप्त ; मुख्य सुत्रधाराचा कसून तपास सुरू

 

चिपळूण २७ जून (संतोष पिलके) :
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री.वाय.एम.पवार विभागीय उपआयुक्त कोल्हापुर व रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा प्रभारी अधीक्षक श्री.व्ही.व्ही.वैद्य यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली दि .२५ / ०६ / २०२१ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड व चिपळुण विभागाचे अधिकारी व कर्मचारी गोव्याकडुन येणा – या वाहनांची तपासणी करीत असताना मौजे खेड लोटे MIDC व राष्ट्रीय महामार्ग क्र .६६ रोडवर अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन गस्ती मोहिम राबविण्यात आली असता प्र.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभाग व दु , निरीक्षक खेड क्र .१ यांना गोपनीय बातमी मिळालेवरून मौजे लोटे गावचे हददीत राष्ट्रीय महामार्ग क्र .६६ वरील एक्सल फाटयावर गोव्याकडुन पनवेलकडे जाणा – या संशयित वाहनांची दारूबंदी कायद्याअंतर्गत सखोल तपासणी करत असताना महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप टेम्पो क्र . MH – 08 – AP – 3473 या वाहनास तपासणीसाठी थांबविले असता सदर टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये खाकी रंगाच्या पुठठयांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची ७५० मि.लि. च्या गोल्डन अंश ब्ल्यु फाईन व्हिस्कि , गोल्ड अॅण्ड ब्लॅक XXX रम असे एकुण ९ २ बॉक्समध्ये ( ८२८ ब.लि. ) एवढा विदेशी मद्याची वाहतुक करीत असताना मिळुन आला . तसेच सदर आरोपीचे ताबे कब्जातुन सॅमसन गॅलक्सी कंपनीचा J6 + मॉडेलचा स्क्रीन टच मोबाईत जप्त करण्यात येवून वाहनासह एकुण मुद्येमालाची किंमत रू .११,६२,००० / – एवढया किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात येवुन सदर मुद्येमालाची वाहतुक करणारा वाहन चालक पांडुरंग दयानंद कदम , रा.मु.पो.वालोपे बेंडकरवाडी ता.चिपळूण जि.रत्नागिरी यास चौकशीसाठी ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द या कार्यालयाचा गुन्हा रजि . क्र .११८ / २०२१ दि .२५ / ०६ / २०२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरची गोवा मद्य आयात करणारा मुख्य सुत्रधार कोण आहे ? याबाबत कसुन चौकशी करण्यात येत आहे . सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक श्री.शंकर जाधव तसेच दु , निरीक्षक श्री.व्ही.व्ही.सकपाळ , सहा.दु , निरीक्षक श्री.आर.बी.भालेकर , जवान श्री.ए.के.बर्वे तसेच चिपळुण विभागाचे प्रभारी निरीक्षक श्री.एस.एन.पाटिल , दु.निरीक्षक एन.डी.पाटिल , जवान – नि – वाहन चालक श्री.ए.व्ही.वसावे , तसेच जवान श्री.एस.एन.वड व शेख यांनी भाग घेतला . सदर गुन्हयांचा पुढिल तपास प्रभारी निरीक्षक श्री.शंकर जाधव करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!