कणकवलीराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

संविता आश्रमातील ‘त्या’ कोरोना बाधितांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार; अरुण दुधवडकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२३ निराधारांचा आधार ठरलेल्या अणाव येथील संविता आश्रमात २९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण कोरोनामुक्त होईपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी शिवसेनेकडून घेतली जाणार आहे. कोरोना बाधितांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च, प्रवास, भोजन, औषधे आणि सकस आहार यांची व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडून केली जाणार आहे. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बोलताना याबाबतची माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, राजु शेट्ये, शैलेश भोगले, सचिन सावंत, कन्हैया पारकर, अँड.हर्षद गावडे, शेखर राणे, स्वरुपा विखाळे, निलम सावंत, राजु राठोड, अनिल हळदिवे, राजु राणे आदी उपस्थित होते

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आहे. शिवसेनेने आजवरच्या वाटचालीत याच तत्वावर मार्गक्रमण केले आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही तीच शिकवण आहे. त्याच मार्गावर संघटना चालणार आहे.

अणाव येथे कार्यरत असलेल्या संविता आश्रमाने आपल्या कार्याने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. निराधारांचा आधार बनलेली ही संस्था जिल्ह्याचा मानबिंदू आहे. मात्र, येथे वास्तव्यास असणाऱ्या २९ जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या निराश्रितांना कुणीही वाली नाही, अशी सध्याची स्थिती आहे. नातेवाईकांनी अव्हेरलेल्या आणि एक-एक दिवस कंठणाऱ्या या सर्वांवर कोरोनाचे संकट कोसळले आहे.

कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना ओरोसला न्यावे लागते. तेथे शासकीय खर्चातून त्यांच्यावर उपचार केले जातात. मात्र, काहीवेळा अधिक उपचारांची आवश्यकता भासते. ती सर्व व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडून केली जाणार आहे.

या संकटामुळे संस्थेने घाबरून जाऊ नये. शिवसेना संस्थेच्या आणि सर्व कोरोना बाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, कोरोना दरम्यान आणि कोरोना मुक्त झाल्यानंतर आवश्यक असणारा सकस आहार आणि औषधे यांची पूर्तता शिवसेनेकडून केली जाईल, असा विश्वास अरुण दुधवडकर यांनी यावेळी दिला.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!