करियरदोडामार्गसामाजिकसिंधुदुर्ग

शेळी पालनासंदर्भात एमसीईडी तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण..

▪️इच्छुकांनी २६ ऑक्टोंबर पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴 दोडामार्ग,दि.२३: उदयोजकतेवर आधारीत शेळी पालन व्यवसायासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण कार्यकम महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्राच्या वतीने मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर पासून आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण कार्यक्रम दहा दिवसांचा आहे. दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल.

कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीमुळे शहरी भागातील अनेक लोकांच्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या आहेत. शहरी भागातील नोकरी करणारे चाकरमानी आता या महानगरातील जीवनाला कंटाळले आहेत. आपल्या गावाकडे असलेल्या शेतजमिनीवर शेती, बागायती, व्यवसाय करायचा विचार ते करु लागलेत. महाराष्ट्रामध्ये उदयोग व्यवसायात मार्गदर्शन प्रशिक्षण देणारी  ‘महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र (एमसीईडी) ख्यातनाम संस्था आहे.कोरोनामुळे केंद्र शासनाने ‘किसान सन्मान योजना’ जाहीर केली आहे. या अंतर्गत स्वतःचा शेती व्यवसाय सांभाळून शेळी पालनाचा व्यवसाय घरबसल्या करता येऊ शकतो. त्यासाठी उदयोजकतेवर आधारीत ऑनलाईन ‘शेळी पालन’ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेळी
पालन व्यवसायाबाबत तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या दहा दिवसीय प्रशिक्षणात कोणत्या शेळ्यांची निवड आपल्या कडील हवामान आणि वातावरणात कशी करावी, शेळयांच्या जाती, शेळयांचा आहार, निवारा, आरोग्य व संवर्धन त्याचप्रमाणे बंदिस्त व मुक्‍त शेळी पालन यांचे फायदे तोटे तसेच राज्य सरकार व जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, शेळीपालनातून आर्थिक सक्षमीकरण  आदीबाबत तज्ज्ञांमार्फत
मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

किमान ७ वी उत्तीर्ण आणि १८ ते ५० या वयोगटातील शेळीपालन व्यवसाय करू इच्छिणारे बेरोजगार तसेच शेतकरी, महिला यात भाग घेऊ शकतात. हे प्रशिक्षण सशुल्क असुन अधिक माहितीसाठी www.mced.co. अथवा https://mced.co.in/training details/?id=114 यावर इच्छुकांनी प्रवेश अर्ज व इतर साठी या वेबसाईटवर अथवा मो नं. ९४२२२०६५४२ /८६६९०५४०७८ / ०२२-२७५६३८९६ यावर दि.२६ ऑक्टोंबर  पर्यंत संपर्क साधावा  असे आवाहन एमसीईडीच्या वतीने सुनील देसाई यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!