लोकराजा, दशावतारातील महासम्राट सुधीर कलिंगण काळाच्या पडद्याआड
*🛑लोकराजा, दशावतारातील महासम्राट सुधीर कलिंगण काळाच्या पडद्याआड*
*_🛑अनेक मान्यवरांनी केला शोक व्यक्त*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*
*🎴 कुडाळदि,: ७ फेब्रवारी* फेब्रुवारी*दशावतारातील “लोक राजा” म्हणून परिचित असलेले तसेच दशावतार कला सातासमुद्रापार नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली नेरूर येथील ज्येष्ठ दशावतार कलावंत सुधीर कलिंगण यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना रात्री दोन वाजता घडली. त्यांच्यावर गोवा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील दशावताराची मोठी हानी झाली आहे.
कलिंगण यांनी कोकणची लोककला टिकणारे दशावतारातील भीष्माचार्य म्हणून नावारूपास आलेले कै. बाबी कलिंगण यांचे सुपुत्र व दशावतारातील नटसम्राट सुधीर कलिंगण गेली २० वर्षे कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ कंपनी चालवत होते. त्यात आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राजाच्या प्रमुख भूमिकेसह महारथी कर्ण, राजा हरिश्चंद्र, राजा श्रेयांग, वृंदा जालंधर, महाविष्णू वेडाचंदन आदी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दशावतार नाटकात काम करताना संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. म्हणूनच २०१० साली ठाणे महापौर पुरस्कार तर चौथ्या मालवणी संमेलनात कृष्णाच्या भूमिकेसाठी सर्व मराठी सिनेकलाकारांनी कौतुकाची थाप मारली. राजाची भूमिका करताना त्याची भाषा राजासारखी असावी असे सुधीर कलिंगण नेहमी सांगत.
दशावतार ही कोकणची लोककला टिकवण्यासाठी सुधीर कलिंगण यांनी नवोदित कलाकारांसाठी सातत्याने मार्गदर्शन केले. सुरुवातीस वनराज नाटकात बालवनराजच्या भूमिकेतून ते प्रथमच रंगमंचावर आलो. त्यात चिलियाबाळ, रोहिदास आदी भूमिकाही केल्या आहेत. त्यानंतर वडिलांनी १९८६ साली स्वतंत्र कलेश्वर दशावतार नाटय़ कंपनी काढली. त्यापूर्वीही १९८४-८५ मध्ये खानोलकर दशावतार कंपनी चालवण्यास घेतली होती. त्यात वडिलांसह ते दोघे भाऊ बाळ व मी कामे करायचो. कधी कधी स्त्रीपात्राची भूमिकाही निभावली. हे सगळं करत असताना दिवसभर एसटी विभागात चालकाची भूमिकाही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती.
राजाच्या प्रमुख भूमिकेसह महारथी कर्ण, राजा हरिश्चंद्र, राजा श्रेयांग, वृंदा जालंधर नाटकातील महाविष्णूची भूमिका, वेडा चंदन आदी भूमिकांतून प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकली. १९९५-९६ साली ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ हे पहिलेच ट्रिकसीनयुक्त नाटक सादर केले.
*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_