रेल्वे अपघातातील महिलेची ओळख पटली
*🛑रेल्वे अपघातातील महिलेची ओळख पटली*
*🛑 देऊळवाडी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी: सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि-० ६ फेब्रुवारी :-*
सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस खाली आलेल्या त्या महिलेची ओळख पटली असून
सीमा सोमा गावकर (३९, रा. मळगांव देऊळवाडी ) असे तिचे नाव आहे. ही घटना आज मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात लातयेवाडी परीसरात रेल्वे मार्गावर घडली होती. अपघातग्रस्त संबंधित महिलेचा मृतदेह छिन्ह-विछिन्ह अवस्थेत आढळून आला होता.
याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आल्यानंतर “त्या” महिलेची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरू होते. अखेर मळगांवच्या पोलीस पाटील रोशनी जाधव यांना संबंधित महिला पहाटे पाच वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नातेवाइकांशी संपर्क साधत तपास केला असता तिची कपड्यांवरून ओळख पटली आहे.
रेल्वे अपघातात मृत झालेल्या सीमा उर्फ प्रिया हिच्या भावाचे अलिकडेच निधन झाले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा पहाड कोसळला होता. मळगाव येथील डंपर व्यवसायिक असलेले सोमा उर्फ संतोष गावकर यांची ती पत्नी तर प्रसिद्ध वडापाव विक्रेते अण्णा बोंद्रे यांची ती बहिण होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सीमा ही भावाच्या निधनानंतर खुपच मानसिक दृष्ट्या त्रस्त झाली होती असल्याचे बोलले जात आहे. तिच्या या अपघाती निधनामुळे गावकर व बेंद्रे कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मृत सीमा हीला दत्तराज हा 17 वर्षीय मुलगा व आर्या ही 15 वर्षीय मुलगी आहे.
याबाबत हवालदार डुमिंग डिसोझा यांनी पंचनामा केला. सदर महिला मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत असून ती सकाळी 5.30 वाजल्यापासून घरातून गायब झाली होती. नातेवाईक तिचा शोध घेत असतानाच या अपघाताबाबत त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ओळख पटली आहे. मृतदेह लवकरच त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*