डॉ. नागवेकर यांनी उभारलेल्या कोवीड डेडिकेटेड केअर सेंटरला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट..
▪️डॉ. नागवेकर यांच्या सामाजिक जाणिवेचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले कौतुक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१९: कोरोना बाधीत रुग्णांसाठी शहरातील वरिष्ठ तज्ञ डॉ. नागवेकर यांनी जानवली येथे उभारलेल्या कोवीड डेडिकेटेड केअर सेंटरला पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. डॉ. नागवेकर यांनी सुरू केलेल्या कोव्हीड बाधित रुग्ण तसेच पोस्ट कोव्हीड उपचार आणि समुपदेशन केंद्राची पाहणी केल्यानंतर डॉ. नागवेकर यांच्या सामाजिक जाणिवेचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी कौतुक केले.
शासनमान्य असलेले ८ बेडचे खासगी सशुल्क कोव्हीड केअर सेंटर डॉ. नागवेकर यांनी जानवली येथे सुरू केले आहे. कोविडची बाधा झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शनाची असलेली गरज डॉ. नागवेकर यांच्या सीसीसीमधून पुर्ण होणार आहे. त्यांच्या या सेंटरला आपल्या शुभेच्छा असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
डाॅ. नागवेकर हॉस्पिटलच्या माध्यमातून जानवली येथे स्वतंत्र जागेत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सेना नेते संदेश पारकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी जि.प. सभापती संदेश पटेल, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रामू विखाळे, संदेश राणे, संजय पारकर, प्रशांत बुचडे, आदी उपस्थित होते.
डॉ. अनंत नागवेकर, डॉ. सौ. किर्ती नागवेकर, डॉ. मयूर नागवेकर, डॉ. मिनल नागवेकर यांनी पालकमंत्र्यांना आयसीयु, जनरल वार्ड, पोस्ट कोविड रुग्णांसाठीची ओपीडी, मार्गदर्शन सुविधा आदीबाबत माहिती दिली.
डॉ. नागवेकर व कुटुंबियांनी सुरू केलेल्या या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना चांगला फायदा होईल. या साथीच्या रोगाच्या पुढील काळात उपचारांचे आव्हान हे सेंटर पार पाडेल, असा विश्वास पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
‘नागवेकर हॉस्पटिल’च्या माध्यमातून स्वतंत्र ‘नागवेकर कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात येत आहे. शहरापासून २ कि.मी. अंतरावर जानवली येथे राष्ट्रीय महामार्गालगत स्वतंत्र जागेत व सर्व अत्यावश्यक सुविधांनी युक्त असलेले हे ८ बेडचे ‘डेडिकेटेड कोविड केअर सेंटर’ सोमवारपासून रुग्ण सेवेत दाखल झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अतिगंभीर रुग्णांना कोल्हापूर व अन्य ठिकाणी जाऊन घ्यावी लागणारी अत्यावश्यक ट्रीटमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे. आयसीयू सह स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये भूलतज्ञ डॉ. किर्ती नागवेकर, फुफ्फुस रोगतज्ञ डॉ. संजय मराठे, डॉ. अनंत नागवेकर डॉ. मयुर नागवेकर या कॅन्सल्टंट डॉक्टरांसहित निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक २४ तास उपलब्ध असणार आहे. कोविड व नॉन कोविड रुग्ण एकाच प्रिमायसेसमध्ये न घेता स्वतंत्र बांधकाम करण्यात आलेले सुसज्ज असे हे कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. सेंटर साठी लागणारा प्रशिक्षीत स्टाफहि उपलब्ध करण्यात आलेला आहे. भविष्याची गरज ओळखून हे सेंटर कायमस्वरूपी हॉस्पटिल स्वरूपातहि आणण्याच्या मानस आहे. या सेंटरच्या माध्यमातून गृह विलगीकरण, आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शन सुविधा, रक्त तपासणी, एक्स रे सुविध, पोस्ट कोविड रुग्णांसाठी फॉलोअप सुविधा अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 8803108108 येथे संपर्क साधावा आवाहन सेंटरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

