कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवली तहसिलमध्ये स्टॅम्प विक्रेत्यांची नागरिकांसोबत मुजोरी..

▪️फक्त एकाच विक्रेत्याकडे लागताहेत रांगा; जिल्हा दुय्यम निबंधकांनी मुजोर स्टॅम्प विक्रेत्यांची लायसन्स रद्द करावी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : भगवान लोके

🎴कणकवली,दि.१९: तहसील कार्यालयात विक्रेत्यांकडून सातत्याने मनमानी करण्याची उदाहरणे समोर येत आहेत. सोमवारी खरेदी साठी आलेल्या नागरिकांना तासनतास ताटकळत उभं राहावे लागत आहे. त्यामुळे मोठी गर्दी त्याठिकाणी उसळली होती. केवळ एकच विक्रेता आपल्यासमोर असलेल्या लोकांना स्टॅम्प विक्री करत होता. तर इतर स्टॅम्प विक्रेते स्टँप विक्रीकडे दुर्लक्ष करुन मुजोरी करत आहेत. या स्टँप विक्रेत्यांची लायसन्स रद्द करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा दुय्यम निबंधक लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांच्या विविध संमतीपत्रे, प्रतिज्ञापत्र, करारपत्र किंवा बँक प्रकरणांसाठी स्टॅम्प पेपर वापरला जातो. सहाजिकच नागरिकांना कणकवली तहसील कार्यालय येथील स्टॅम्प विक्रेत्यांनी खरेदीसाठी यावं लागते. साधारण तालुक्यात १२ स्टॅम्प विक्रेते आहेत.

कणकवली तहसील कार्यालयाच्या दुय्यम निबंधक कार्यालय बाहेर पाच ते सहा टेबल त्या विक्रेत्यांच्या बसण्याच्या सोयीसाठी देण्यात आली आहेत. त्या ठिकाणी आपले अन्य व्यवसाय सदर स्टॅम्प विक्रेते करत आहेत. मात्र, गोरगरीब तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना मुजोर विक्रेते स्टॅम्प विक्री टाळाटाळ करत आहेत.

या संदर्भात अनेकदा तक्रारी करुन देखील कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयप्रमुख दुर्लक्ष करत आहेत. कारण त्या दुर्लक्षामागे दररोजच्या  खरेदी-विक्री प्रकरणांमध्ये अर्थकारण दडलेले आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच जिल्हा दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांनी सदर स्टॅम्प विक्रेत्यांची चौकशी करुन जे स्टॅम्प विक्री करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांची लायसन रद्द करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!