कुडाळराजकीयसिंधुदुर्ग

शिवसेना व भाजपच्या नेत्यांना सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सोयरसुतक उरले नाही का; मनसेचा सवाल..

सर्वसामान्य जनतेला फक्त महाराष्ट्र सैनिकच वाली; असे चित्र!

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०५: जनतेची पिळवणूक करून  लूटमार करणाऱ्या ‘काही’ खाजगी डॉक्टरांना शिवसेना जाहीर पाठिंबा देते ह्याला म्हणावे तरी काय..? आज जिल्हयात बहुतांशी खाजगी डॉक्टर प्रामाणिकपणे व निःस्वार्थी पणे सेवा देत आहेत ह्यात दुमत नाही परंतु काही डॉक्टर जनतेची अक्षरशः लूटमार करत आहेत हे सुद्धा नाकारता येत नाही. अशा डॉक्टरांच्या विरोधात जनप्रक्षोभ वाढत असताना शिवसेना मात्र तलवार म्यान करते ही खेदजनक बाबा आहे. तर दुसरीकडे  ‘नौटंकीबाज’ पत्रकार अर्णब गोस्वामीसाठी भाजप आंदोलन करण्याचा इशारा देतो. अर्णबला अटक होणे एवढी संवेदनशील बाब आहे का हा खरा प्रश्न आहे. केंद्रासह जिल्हा परिषदेत सत्तास्थानी असलेली भाजपा व राज्यातील सत्ताधारी शिवसेना पक्षांच्या स्थानिक नेत्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांशी देणं घेणंच राहिलं नाही असे चित्र बहुदा आहे.सामान्य जनतेच्या वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरमसाठ लूटमार करणाऱ्या काही खाजगी डॉक्टरांच्या विरोधात वाढत चाललेला जनप्रक्षोभ पाहता शिवसेनेचे स्थानिक वरिष्ठ नेते अशा डॉक्टरांना पाठिंबा जाहीर करतात तर दुसरीकडे वाचाळविर पत्रकार अर्णब गोस्वामीसाठी भाजपचे नेते आंदोलन करण्याचा इशारा देतात हे जनतेचे दुर्दैवच म्हणावं लागेल.परंतु या सगळ्यामध्ये ज्यांच्यामुळे निवडून गेले ती जनता नेमकी कुठे आहे, आज कशा अवस्थेत जगतेय याचं साधं भान या राज्यकर्त्यांना राहीले नाही हे दुर्दैव आहे. आज सामान्य जनतेचे वाढलेल्या महागाईने अक्षरशः कंबरडे मोडत आहे, शेतकरी राजा जगण्यासाठी संघर्ष करतोय, युवावर्ग  बेरोजगारीमुळे हवालदिल तर झाला आहेचं शिवाय नैराश्यातून नशेच्या आहारी    जातोय, लोकडावन काळातील ठप्प अर्थव्यस्थेमुळे रोजनदारी कामगार वर्ग हाताला पुरेसे काम नसल्याने जगण्यासाठी धडपड करतोय, शासनाच्या धरसोड धोरणांमुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जात  असल्याने पालक चिंतेच्या गर्हतेत वावरत आहेत, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा, लोकडावन काळातील वाढीव बिलांच्या ओझ्याखाली कुटुंबचालक दबला गेलायं अशी वाताहातजन्य परिस्थिती समोर असताना शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षांचे नेते मात्र एमकमेकांना माकड, उंदीर म्हणत आव्हाने प्रतिआव्हाने देत वैयक्तिक टीका टिप्पणीत मशहुल राहून मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करत आहेत, याकडे आता जनतेनेच डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. निवडणुकांमधील जाहिरनाम्यातल्या किती गोष्टी पूर्ण केल्या, खैरात केलेल्या आश्वासनांचे पूढे काय झाले याचा जनतेने कधीतरी जाब विचारावा..! सर्वसामान्य जनतेचे मूलभुत प्रश्न सोडून भलत्याच विषयांसाठी संघटनेची ताकद पणाला लावणारे पक्ष एकीकडे तर सामान्य जनतेच्या दैनंदिन समस्यांबाबत प्रशासन पातळीवर वाचा फोडणारे प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देणारे राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक दुसरीकडे अशी वस्तुस्थिती असून लोकांनीच याचा गांभीर्याने विचार करावा अस मत मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!