कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शेंबड्या आमदार दीपक केसरकर ला जनता कशी काय निवडून देते.- केंद्रीय मंत्री राणेंची आ. केसरकरांवर टीका

*🛑शेंबड्या आमदार दीपक केसरकर ला जनता कशी काय निवडून देते.- केंद्रीय मंत्री राणेंची आ. केसरकरांवर टीका*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:२२नोव्हेंबर*
केंद्रीय लघु सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावा पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांची मत, समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, जिल्ह्याचा खासदार, सावंतवाडी, कुडाळचा आमदार भारतीय जनता पार्टीचा नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, जिल्हा भाजपमय झाल्यास आमदार, खासदार हा तुमच्यातीलच होणार आहे असं मत व्यक्त केले. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसन जिल्ह्याला काय दिल ? आम्ही जे केलं हे कोणालाच जमलं नाही. सावंतवाडीकर जनता शेमड्या आमदाराला कसं काय निवडून देतात हे कळत नाही.
यांना विधानसभेत धड बोलता येत नाही. आम्ही विधानसभा हलवून टाकली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला होता. मात्र, आत्ताची शिवसेनेची पिल्लं साध बोलू शकत नाहीत असा प्रहार नारायण राणे यांनी केला. तर विमानतळ आम्हीच आणलं असं सांगणारा खासदार रात्रीचा दिसत नाही, दिवसांचा दिसतो. चीपी विमानतळ आम्हीच केलं म्हणणाऱ्यांना पंतप्रधान भाजपचे आहेत हे लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे. जे दिसेल ते आम्ही केल म्हणायची शिवसेनेला सवय असल्याचा टोला हाणला. तर हे शिवसेनेचे नेते हे थापाडे असून कोणाच्या घरात मुलं जन्माला आलं तरी त्याचं श्रेय घेतील असा घणाघाती हल्लाबोल केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पद मागा देईन, पण गद्दारी सहन करणार नाही. आपल्याच माणसांना पाडायचं सहन करणार नाही असा सणसणीत इशारा पुन्हा एकदा दिला. सावंतवाडी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. सावंतवाडी हा माझा आवडता तालुका असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. तालुका भाजपमय करा अस आवाहन नारायण राणे यांनी केल.
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, शैलेंद्र दळवी, संध्या तेरसे, अंकुश जाधव, पुकराज पुरोहित, शर्वनी गावकर, प्रमोद कामत, महेश सारंग,गुरुनाथ पेडणेकर,नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, परिमल नाईक,दीपाली भालेकर, निकिता सावंत, मानसी धुरी, महेश धुरी, अजय गोंदावले, दिलीप भालेकर, प्रमोद गावडे,केतन आजगावकर, जावेद खतीब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!