केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली सावंतवाडी नगरपरिषदेत नगरसेवकांची शाळा
.*🛑केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली सावंतवाडी नगरपरिषदेत नगरसेवकांची शाळा*
*_🛑 प्रत्येक माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो,मी आजही विद्यार्थीच -नारायण राणे*
*🛑नारायण राणे यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*सावंतवाडी,दि,:-२८ऑक्टोबर*
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे केंद्रीय लघु सुष्म उद्योगमंत्री नारायणराव राणे यांनी आज सावंतवाडी नगर परिषद ला भेट देऊन सत्ताधारी नगरसेवकांना मार्गदर्शन करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, यावेळी बोलताना राणे यांनी राजकारणातील खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक ही पदे म्हणजे मालकी नसून जनतेची सेवा करण्याचे आहे हे भान ठेवून काम केल्यास जनता आपला पुन्हा पुन्हा स्वीकार केले असे सांगून तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम आपल्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांना करावे असेआवाहन केले.
मी मुंबई मध्ये काम करत असताना सात वर्षे नगरसेवक राहिलो, तीन वेळा बेस्ट चेअरमन झालो, महापौर बनण्याचे स्वप्न असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परशुराम उपरकर, राजन तेली व त्यावेळचे जिल्हाप्रमुख वसंत केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आपल्याला कणकवली मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला बोलवून तू कोकणात जाऊन सिंधुदुर्गात लढायचे असे आदेश दिले, मी म्हणत होतो मला महापौर व्हायचं आहे त्या वेळी ते ऐकायला तयार नव्हते.
त्यांच्याबरोबर विदर्भाचा दौरा करत असताना जनतेच्या मनातील कौल पाहिला ,त्यावेळी शिवसेनेची सत्ता येईल असे वाटले व सत्ता आली व आपण आमदार झालो तर मंत्री होणार असे वाटू लागले व कणकवलीत येऊन लढण्याचा निर्णय घेतला ,त्यावेळी मतदार संघातील ग्रामपंचायत पासून पंचायत समिती पर्यंत सर्व माहिती राजन तेली, उपरकर, यांनी करून दिली ,व मतदार संघाचा पूर्ण अभ्यास केला व कार्यकर्त्यांच्या जीवावर विजय मिळविला, आमदार झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे नित्याचे झाले ,कोणताही नेता किती शिकला तरी तो शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो ,आज पर्यंत आम्ही शिकत आहोत असे राणे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलो आता देशाच्या राजकारणात केंद्रीय मंत्री आहे यामागे जनतेचे आशीर्वाद अभ्यासू वृत्ती आहे ,त्यामुळे सर्व नगरसेवकांनी आपल्या नगरपालिका कायद्याचा अभ्यास करून नगरपालिकेची कार्य व कर्तव्य कोणती ,अधिकार कोणते, याचा सखोल अभ्यास करावा तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवावेत, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न ,निकाली काढावा म्हणजे खऱ्या अर्थाने विकास काम केल्यासारखे होईल असे राणे यांनी स्पष्ट केले.
माझ्या अभ्यासवृत्ती मुळे मी कधीच कुठे विषय मांडताना कमी पडलो नाही नाही हे तुम्हीही पाहिले असेल व त्यामुळे अधिकारीवर्ग ही माझ्याबद्दल आदरयुक्त भीती बाळगायचेत , अधिकारी व पदाधिकारी यामध्ये अंतर असणे गरजेचे आहे असे राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले, केंद्रीय मंत्री पद स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील माझ्या खात्याच्या सचिवांना बोलावून त्यांच्याकडून सर्व माहिती करून घेतली, व दुसऱ्या दिवशीच माझ्या खात्याची अधिकाऱ्यांची बैठक लावली, त्यावेळी अधिकारीही अवाक झालेत
जसे महाराष्ट्रात आपले नाव घेतले जाते तसे दिल्लीतही कोकण चा आवाज बुलंद राहिला पाहिजे यासाठी माझी धडपड असते ते निश्चितपणे आपलेही नाव दिल्लीमध्ये घेतले जाईल असे राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले,आपल्या खात्याचा उपयोग तळागाळातील जनतेला व्हायला पाहिजे नवयुवक बेरोजगार युवकांनी उद्योगासाठी पुढे आले पाहिजे ,छोटे-मोठे उद्योग वाढले पाहिजेत त्यासाठी कुठेही अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू असा विश्वासही यावेळी बोलताना राणे यांनी दिला.
सध्याच्या शासनाच्या नाकर्तेपणामुळे व आमदार दिपक केसरकर यांच्या चुकीच्या नियोजनाने अनेक प्रकल्प बारगळलेत व जनतेला देशोधडीला लावण्याचे काम माजी पालक मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले ,खोटे बोला पण रेटून बोला ,गोड बोला व जनतेला फसवा हेच धोरण केसरकर यांनी राबविले त्यामुळे जनता फसत गेली, पण ही जनता जास्त काळ फसणार नाही असा विश्वास यावेळी बोलताना राणे यांनी व्यक्त केला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

