स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या न्यायहक्कासाठी नगर परिषद समोर उपोषण करावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते*
*🛑*शहरातील स्थानिक युवकाला देशोधडीला लावून प्रशासन कोणते इच्छीत साध्य करणार**
*🛑रवी जाधव याला कोण वाली नाही, असा गोड गैरसमज कोणी करुन घेऊ नये*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय: सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-१५ ऑगस्ट*
सावंतवाडी नगरपालिकेचे प्रशासन जर कायद्याच्या कचोटीत राहून काम करत असेल तर रवी जाधव यांचा स्टॉल हटवते वेळी रीतसर पंचनामा करून त्याचा माल ताब्यात घेतला असेल तर हा माल रवी जाधव याला पंचा यादी सह परत द्यायला नगरपरिषद प्रशासनाला अडचण काय आहे,हा सावंतवाडी वासियांना पडलेला प्रश्न आहे, नगरपालिका प्रशासनाने बेकायदेशीर रीत्या रवी जाधव यांचे सामान व घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जप्त केला असेल तर नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणे गरजेचे आहे,असे आमचे ठाम मत आहे.
चराठा गावची वाडी सावंतवाडी,नंतर संस्थानची सुंदरवाडी, या सावंतवाडी शहराला पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज, सद्गुरु साटम महाराज,भारती महाराज,यांचा वारसा आहे,या संस्थानला महात्मा गांधी यांनी राम राज्य म्हटले होते त्या संस्थानात कोण रावण जन्माला आला तर तो टीकेल का याचा विचार संबंधितांनी करावा,या सावंतवाडी शहरात सर्वच समाज गुण्यागोविंदाने राहत होते,या पाटेकर उपरलकर च्या भूमित ज्याने अती केले त्याची माती झाली हा इतिहास आहे, त्यामुळे सत्तेच्या जोरावर कुणाच्या तरी सांगण्यावरून रवी जाधव याला चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून असे असंख्य रवी जाधव निर्माण होतील, त्यामुळे सावंतवाडी नगराध्यक्ष व आमचे वर्ग मीत्र संजू परब यांनी हा विषय जास्त न तांडता तो सराईतपणे हाताळावा व रवि जाधव याला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे,
नगराध्यक्ष संजू परब यांना दूरवरचे राजकारण करायचे आहे, त्यामुळे अशा किरकोळ विषयाचा कोणाच्या तरी सांगण्यावरून बाहू करुन घेण्यापेक्षा तो चूटकीसारखा सोडवून टाकावा असे आम्हाला वाटते, शहरात अनेक समाजाची माणसे व्यवसाय करातात, त्यात परप्रांतीय ,घुसखोर जास्त,व त्यांची मक्तेदारी या सावंतवाडीवर आणि मक्तेदारी करणाऱ्या या घुसखोरांचे कोण नेतृत्व करुन स्थानिक युवकांना देशोधडीला लावायचे काम समाजसेवक ,शहरसुधारक करत असेल तर अशा शहर सुधारकांची जन्म कुंडली बाहेर काढायला आम्हाला वेळ लागणार नाही हे संबंधितांनी ध्यानी ठेवावे.
शहरात जुगार,मटका गांजा,चरस ,दारु,याचे खरे हस्तक कोण ,कोणाच्या वरदहस्तामुळे हे सर्व चालत आहे,त्याची माहिती ही आम्हाला सावंतवाडीतील एका सुजाण नागरिकांने पत्राद्वारे पाठविली आहे, त्यामुळे गोरगरीबांना छळण्याचे काम बंद करा अन्यथा तुमच्या पापाचे घडे वेळे आधिच भरतील हे लक्षात ठेवा.
रवी जाधव याचा मार्ग चुकलाही असेल मात्र अशा पध्दतीने एखाद्याला संपविण्याचा प्रयत्न करने हे निश्चितच निषेधार्ह आहे,आपण कोणाच्या पोटाला देऊ शकत नसू तर त्याचा घास हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही,उच्च शिक्षित असून सुद्धा जो युवक न लाजता रस्त्यावर सामान विकून आपले कुटुंब चालवतो त्याचे कौतुक करायचे सोडून त्याच्या पोटावर मारायचे हा कुठचा न्याय,त्याने मागणी केलेल्या जागेवर मुद्दाम दुसऱ्या व्यावसायिकाला जागा देणे हे कितपत योग्य आहे,याचे उत्तर नगर परिषद प्रशासनाने द्यावे, कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी जर रवि जाधव याच्या स्टाॅलवर रितसर कारवाई केली असेल तर पंचनामा यादी द्यायला प्रशासन का घाबरते,का त्या युवकाला तीन दिवस भर पावसात उपोषण करायला का लावले, स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या न्याय्य हक्कांसाठी साठी अशा प्रकारे एखाद्या सुशिक्षित बेक्षोजगार युवकास नगरपालिके समोर उपोषण करावे लागत असेल तर या पेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते याचा पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी विचार करावा एवढेच आमचे म्हणणे आहे.
सुशिक्षित बेरोजगार पदवीपर्यंत व नंतर उच्च शिक्षण घेतलेला हा युवक रस्त्यावर बसून स्वतःचे उपजीविकेचे साधन निर्माण करतो व इतर बेरोजगारांना आधार देतो, त्याचा आदर्श घ्यायचे सोडून त्याला देशोधडीला लावण्याचे काम प्रशासनाच्या आडून जर कोण करत असेल तर त्याला वठणीवर आणणे गरजेचे आहे ,सावंतवाडी शहरात गल्लोगल्ली अनेक विक्रेते आपला व्यवसाय आहेत मात्र शहराचा रहिवासी असलेला रवी जाधव याला व्यवसाय करू दिला जात नाही या मागचा खरा सूत्रधार कोण आहे? तो सूत्रधार रवी जाधव यांच्या मागे का लागला? यामागचा त्याचा स्वार्थ काय? हे ही तपासतणे गरजेचे आहे.रवी जाधव गरीब आहे त्याला वाली कोण नाही, असा गोड गैरसमज कोणी करून घेतला असेल तर लवकरच त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटेल हे ही आम्हाला या निमित्ताने सांगावेसे वाटते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_कोरोना संकट असुंदे नाहीतर लाँकडाऊन..निश्चिंत रहा..तुमच्या लाडक्या भावाला तुमची मनपसंत राखी घरपोच आम्ही पोहोचवणार आहोत…विश्वसनीय,खात्रीशीर, जलद,कमी दरात,आपल्या हक्काची कुरियर सेवा *तेज कुरियर्स*_
_🎁🎊राखी एक प्रतिक पवित्र नात्याचे_
_बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचे..!!🎁🎉_
*🏮रक्षाबंधन बुकिंग सुरु🏮*
_महाराष्ट्र, गोवा यासह देशातील व विदेशातील प्रमुख शहरांसाठी रेग्युलर व प्रीमियम सेवा_
*🧧राखी बुकिंग साठी आकर्षक एन्व्हलप(पाकीट) मोफत उपलब्ध*
*◼️बुकिंगसाठी संपर्क:*
*तेज कुरियर्स*
_घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट आँफीस,उभाबाजार चितार आळी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग_
🎴9405475712
🎴9420041182
☎️02363-274067
*📶तेज कुरियर लोकेशन*
Tej couriers
https://maps.app.goo.gl/7cN4Q67x8k3HMEFHA
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*