कोकणातील बुलंद आवाज भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती म्हणजे शिवसेचा भविष्यातील व्यूह रचनेचा भाग.
कोकणातील बुलंद आवाज भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती म्हणजे शिवसेच्या भविष्यातील व्यूह रचनेचा भाग.
भास्कर जाधव यांच्या निवडीने रत्नागिरी, सिंधुदुर्गात सेना अधिक भक्कम होईल.
कोकणातील बुलंद आवाज भास्कर जाधव यांची शिवसेना ‘नेते’ पदी नियुक्ती करून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये शिवसेनेने एक प्रकारे राजकीय ‘ खेळी’ केली आहे.
आमदार भास्कर जाधव म्हणजे ‘अरे ला कारे’ आणि जुन्या शिवसेनेच्या ‘स्टाईल’ ला शोभणारे आणि शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांमध्ये ‘क्रेज’ असलेले नेतृत्व आहे, विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदारसंघात त्यांचा बऱ्यापैकी संपर्क आहे,त्यांना मानणारा कार्यकर्त्याचा मोठा वर्ग आहे,
शिवसेनेत शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुकाप्रमुख, एस.टी.कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते चिपळूण चे तीनवेळा आमदार, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही सिंधुदुर्ग चे निरीक्षक, प्रदेश सरचिटणीस ते प्रदेशाध्यक्ष आणि त्याच बरोबर कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद आमदार, मग गुहागर विधानसभेचे आमदार ते राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री. इतका व्यापक आणि अनुभवसंपन्न त्यांचा प्रवास
संघटना व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे प्रदिर्घ अनुभव असल्यामुळेच कार्यकर्ते ‘ सांभाळ करण्याची किमया त्यांच्या कडे आहे.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्या नंतर शिवसेना कमजोर झाली होती पण त्यांना चॅलेंज करण्याचे धाडस आणि राणे विरोधी ‘स्पेस’ भरून काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस ने केला आणि त्यात अग्रेसर नाव ‘भास्कर जाधव’ यांचे होते.
ज्यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारीही खारेपाटण ला आल्यावर आपले गाडीवरचे झेंडे काढून टाकत सिंधुदुर्गात प्रवेश करत असत, त्याच वेळी
राणेंवर जहरी टीका , त्यातून एकमेकांच्या कार्यालयाची तोडफोड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाय ठेवून दाखवा म्हणून निलेश राणे यांचे चॅलेंज आणि ताबडतोब एका आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा करून ‘दम’ दाखवणारा नेता म्हणजे भास्कर जाधव.
मालवण नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी गल्ली बोळात फिरून आक्रमक प्रचार केला, आणि त्यात यश मिळवून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये युवक अध्यक्ष पदावरून नेहमी ‘गट बाजी’ आणि संघर्ष जोरात असायचा पण जिल्ह्यातील सर्व नेते विरोधात असूनही, नेहमी नेतृत्वासाठी डावलल्या गेलेल्या एका गटाच्या युवकांची बाजू मनाला पटली म्हणून आपल्या कार्यकर्त्यांच्या अग्रहासाठी, पुढचा मागचा विचार न करता, विरोध न जुमानता, थेट हेलिकॉप्टर ने ‘युवक काँग्रेस’ च्या ‘प्रती मेळाव्यासाठी’ उपस्थित राहिले.
जान्हवी सावंत सारख्या अनेक तिसऱ्या चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना निवडणुकीत संधी आणि मार्गदर्शन करून नावारूपाला आणले.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना दीपक केसरकर, उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्या मुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले काम करूनही ‘नो एन्ट्री’ होती, आणि पुन्हा शिवसेनेत आल्यावरही उदय सामंत-दीपक केसरकर या नेत्यांमुळे ‘नो एन्ट्री’ होती.
पण “नेते” पदी संधी मिळाल्यावर तरी त्यांना किती काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘एन्ट्री’ मिळेल, हे औत्सुक्याचे ठरेल. सध्या शिवसेनेत ‘मूळ-जुने’ शिवसेनेतील कार्यकर्ते हे संपर्क प्रमुख श्री.अरुण दुधवडकर समर्थक, इतर पक्षातून आलेले नविन पदाधिकारी- लोकप्रतिनिधी हे विनायक राऊत समर्थक, आमदार.श्री.वैभव नाईक समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षा मधून आलेले आणि पदाधिकारी नसलेले कार्यकर्ते अशी ‘अंडर करंट’ गट आहेत, वर वर दिसत नसले तरी एकमेकांची नाराजी आहे. सत्ता गेल्या नंतर नैराश्यही आहे.
ह्यात सगळ्या गटांशी शिवसेना शिंदे गटाचे उद्योगमंत्री श्री.उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री श्री.दीपक केसरकर यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे अनेक जण संपर्कात आहेत काही जण ‘वेट अँड वॉच’ मध्ये आहेत.
सेना नेतृत्वाची ‘स्ट्रॅटर्जी’ योग्य असली आणि जुन्या नव्या सगळ्यांना सोबत जोडण्याची किमया असली, क्षमता-अनुभव आणि करिश्मा असला तरी, श्री.भास्करराव जाधवांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्व ठेवून असलेले आणि वर्चस्व ठेवू पाहणारे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी किती संधी देतील,की पक्षप्रमुखांकडे काड्या करतील हा येणारा काळच ठरविणार आहे.