कोकणसंपादकीयसामाजिकसिंधुदुर्ग

श्री देव पाटेकर च्या स्थळात सुनील पेडणेकर व प्रा सतीश बागवे यांच्यात झालेली हाणामारी दुर्दैवी

*🟥श्री देव पाटेकर च्या स्थळात सुनील पेडणेकर व प्रा सतीश बागवे यांच्यात झालेली बाचाबाची दुर्दैवी*

*🟥विचारांची लढाई विचारानेच लढली जावी ही सावंतवाडीची संस्कृती*

*🟥सुनील पेडणेकर चिरफाड सोशल मीडिया सदरातून कोणाची बदनामी करत असेल तर न्यायदेवता आहे*

*🟥कोणीही कायदा हातात घेऊन राडा संस्कृती पुन्हा उदयास आणू नये*

*🟥श्री देव पाटेकर च्या भूमीत ज्यांनी ज्यांनी अती केले,त्यांची माती झाली हा इतिहास आहे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:२२ मे*
सावंतवाडी संस्थानचे बापूसाहेब महाराज यांनी आपल्या साम्राज्याला राम राज्याचा लौकिक प्राप्त करून दिला होता,या शहराला शैक्षणिक, आध्यात्मिक, सांस्कृतीक, वारसा लाभलेला आहे, या शहरात विचारांची लढाई विचारांनीच लढली जाते,सावंतवाडी शहराला सुसंस्कृत शहर असे म्हटले जाते, मात्र मध्यंतरीच्या काळात दारू माफिया, गांजा तस्कर, यांच्यामुळे सावंतवाडी शहराच्या नावाला कुठेतरी गालबोट लागत होते,आम्ही यावर सडेतोड लिखाण केल्यावर काही प्रमाणात अशी कृत्य रोखण्यात आम्हाला यशही मिळाले,चार दिवसापूर्वी सुनिल पेडणेकर व प्राध्यापक सतीश बागवे यांची हॉटेल पाॅम्पस समोर बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले, खरेतर प्राध्यापक सतीश बागवे यांनी सुनिल पेडणेकर यांनी आपल्याबद्दल काही लिखाण केले असेल तर त्याबाबत योग्य त्या न्यायालयात दाद मागणे उचित ठरले असते, मात्र अशाप्रकारे रस्त्यावर उतरून मारामारी करणे ही सावंतवाडीची संस्कृती नाही हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे असे आमचे ठाम मत आहे.
खरेतर या विषयावर आम्ही काही लिहायचे नाही असे ठरवले होते,मात्र अनेकांनी सिताराम तू या बद्दल काहीतरी लिह अशी वारंवार मागणी केल्याने मला सत्य मांडणे भाग पडत आहे, अनेक अडचणीच्या वेळी व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर खऱ्या अर्थाने मला साथ दिली ती ऍड बापू गव्हाणकर, ऍड विक्रम भांगले, सोशल मीडिया चिरफाड वर लेखन करणारे व ज्यांच्याशी आमची १९९० पासून मैत्री आहे ते सुनील पेडणेकर यांनी,आम्ही हे कधीही नाकारू शकत नाहीव विसरूही शकत नाही, कारण माझ्यावर ज्यावेळी वाईट प्रसंग आले त्यावेळेस माझ्या बाजूने ठामपणे उभी राहिलेली एकमेव व्यक्ती म्हणजे सुनील पेडणेकर, त्यामुळे त्याच्या कठीण प्रसंगात त्यांच्या सोबत राहणे हे देखील आमचे कर्तव्य आहे. राहाता राहिला विषय सुनील पेडणेकर सोशल मीडिया वरून जे काही लिहीत आहेत ते, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यांनी कोणाबद्दल लिहावे, काय लिहावे,कसे लिहावे हा त्याचा वैयक्तिक विषय आहे त्यात मी ढवळाढवळ करीत नाही की त्याला विचारतही नाही, त्यांनी मला विचारले तर मी त्यांना असे सुचवेनही की तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनावर काही लिहू नका, मात्र सुनील पेडणेकर हे सिद्धहस्त लेखक आहेत ,त्यामुळे मी काहीतरी सांगितले म्हणून त्याच्या लेखणीवर त्याचा परिणामही होणार नाही. सुनील पेडणेकर संघर्षाला घाबरत नाही, त्यांच्यावर अनेक हल्ले झालेले आम्ही याची डोळा पाहिले आहेत व त्या सर्वांना ते पुरुनही उरले.
दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे संपादक मुकुंदराव कदम हे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधीवर व पत्रकारांवरही अगदी खालच्या शब्दात टीका करायचे,शब्दरुपी अस्त्राने झोडायचेत शब्दरूपी शस्त्राने अनेकांना घायाळ करायचे,मात्र मुकुंदराव कदम यांच्याशी दोन हात करण्याचे कोणी धाडस केले नाही, ज्याने केले ते संपले,सुनील पेडणेकर यांचा लिखाणाच्या बाबतीत कुणी हात धरू शकत नाही, चिरफाड नावाचे सदर सोशल मीडिया वर चालवून या सदरात अनेकांचे घोटाळे अनेकांचे कारणामे उघड करत असतात आणि असे काही छापून आल्यानंतर पत्रकारितेतील काही असंतुष्ट आत्मे हे सर्व सीताराम गावडे सांगतो व पेडणेकर लिहीतो असे सांगून काही जणांना भडकवण्याचा प्रयत्न करत असतात,मात्र हे आपल्यापर्यंत येत नाही तो पर्यंत आपण या विचारायचे नाही असे मी ठरवून ठेवले आहे व जेव्हा अशी गोष्ट पुराव्यानिशी मला मिळेल त्या दिवशी त्या व्यक्तीचे लेखनीच्या दुधारी अस्त्राने कपडे काढल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे पण ठामपणे सांगू इच्छितो.
अलीकडे सुनील पेडणेकर यांनी बरेच विषय हाताळले, अनेकांच्या अडचणीला धावून जाणारा,हवे त्याला नडण्याची हिम्मत दाखवणाऱ्या सुनील पेडणेकर यांच्या मदतीला आबा खवणेकर यांचा सोशल मीडिया पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ धावून आला,मात्र सावंतवाडीतील एकाही पत्रकाराने पोलीस स्थानकात झालेल्या परस्परविरोधी तक्रारी बद्दल एक अवाक्षरही छापले नाही, तीस वर्षे पत्रकारिता करत असताना माझ्याविरुद्ध सुद्धा अनेकांना मी डोईजड होत आहे असे दिसताच मला अडकविण्याचे प्रयत्न झालेत मात्र श्री देव पाटेकर रयत पिलगीचा रक्षण कर्ता श्री देव उपरलकर, तसेच माझी कुलदैवत आई तुळजाभवानी ,गावदेवता माऊली, यांच्या खंबीर कवचामुळे माझा कोणी केस सुध्दा वाकडा करू शकले नाहीत, उलट ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांचा न्याय निवाडा श्री देव पाटेकर व उपरलकर यांनी केला.
सावंतवाडी या पवित्र भूमीत अशाप्रकारच्या दांडगाई, दहशत, अरेरावी जास्त काळ टीकत नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने सबुरीने घ्यायला हवे असे आमचे ठाम मत आहे. कोणाच्या विरोधात वैयक्तिक टिका टिप्पणी सुनील पेडणेकर यांनी चिरफाड च्या माध्यमातून केली असेल तर संबंधित व्यक्ती त्याच्याविरुद्ध सनदशीर मार्गाने न्यायालयात दाद मागू शकते, मात्र अशाप्रकारे कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणे ,रस्त्यावर मारामारी करणे योग्य नसल्याचे आमचे मत आहे, कोण चुकीचे वागत असेल तर त्यांला सनदशिर मार्गाने वठणीवर आणता येते,मात्र अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करने निश्चितच भूषणावह नाही व समर्थन पण करु शकत नाही, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही साव़ंवाडीची संस्कृती जपायची असेल अशा राड्यांना तिलांजली ही द्यायलाच हवी कारन आता एकमेकां विरुद्ध लढण्याचे दिवस राहिले नाहीत,परकीय शक्तीने आपल्या मध्ये घूसून आपली बाजार पेठ काबीज केली आहे,सर्वच धंद्यात ही शक्ती उतरली आहे, त्यामुळे स्थानिक व्यापारी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे म्हणून जागे व्हा, एकमेकांच्या काॅलरला हात घालण्या पेक्षा त्याच्या खांद्यावर हात टाकून पुढे जाण्यासाठी त्यांना धीर द्या नाहीतर आपल्या भांडणात ही परकीय शक्ती कधी आपल्यावर कब्जा करेल ते सांगता ही येणार नाही.
सावंतवाडी पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पुढे काही अघटीत घडू नये म्हणून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते.
श्री देव पाटेकर व रयत पिलगीचा रक्षण कर्ता ३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर यांने सर्वाना सुबुद्धी देवो हीच प्रार्थना

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!