वाह…गजब …अजब कारभार..१६ ग्रॅम गांजा मिळालेला म्हणे प्रमुख सूत्रधार*

 

*▪️गांजा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधाराकडे मिळाला फक्त १६ ग्रॅम गांजा आणि म्हणे प्रमुख सूत्रधार*

*▪️हा तर मुख्य सुत्रधाराला वाचविण्यासाठी चाललेला खटाटोप तर नाही ना? एकच संशय*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी :*
गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यात कुडाळ पोलिसांना यश मिळाले आणि म्हणे कुडाळ पोलिसांनी डोंगर पोखरून उंदीर काढला… हा सर्व खटाटोप होता फक्त खऱ्या मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठी, आणि जो बनावट मुख्य सूत्रधार तयार केला त्याच्याकडे सापडला फक्त सोळा ग्रॅम गांजा, आणि म्हणे तो मुख्य सूत्रधार, हा सर्व खटाटोप गांजा प्रकरण फाईल बंद करण्यासाठी तर नाही ना असा संशय येऊ लागला आहे, कणकवलीतील संकेत उर्फ सनी महिंद्रकर याला बळीचा बकरा बनवले जात असल्याची चर्चा सध्या सिंधुदुर्गात रंगू लागली आहे.
या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर व दूरवर पसरल्यामुळे कोणताच राजकीय पक्ष यावर बोलू इच्छित नाही यातच सर्व काही आले, गांजा प्रकरणातील ज्या सनी महिंद्रेकर ला प्रमुख सूत्रधार म्हणून ताब्यात घेण्यात आले, त्याच्याकडे फक्त १६ ग्रॅम गांजा सापडला, आणि त्याचा हस्तक असलेल्या बॉबी बेग याच्याकडे तीन किलो गांजा सापडला, विचार करण्यासारखी गोष्ट आहे जो गांजा पुरवतो त्याच्याकडे १६ ग्रॅम गांजा मिळतो व जो दुसऱ्यांना विकतो त्याच्याकडे तीन किलो ,म्हणजे पुरवणारा किरकोळ मालाचा घाऊक व्यापारी तर विकणारा घाऊक मालाचा किरकोळ व्यापारी, काय बोलावे व काय सांगावे हेच समजेनासे झाले,म्हणूनच म्हणालो उद्धवा अजब तुझे सरकार लहरी पोलिस, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार.
वास्तविक या मुख्य सूत्रधाराला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असे कुडाळ पोलिसांचे म्हणणे आहे त्या मुख्य सूत्रधाराकडे गांजाचा भला मोठा साठा असायला हवा होता, मात्र एखाद्या सिनेमा स्टाईलने सनी महिंद्रकर याला पकडून मिळवले काय तर फक्त १६ ग्रॅम गांजा आणि म्हणे आम्ही मुख्य सूत्रधाराला गजा आड केले, हा बनाव कशासाठी व कोणासाठी असा माझा प्रश्न आहे जर मुख्य सूत्रधार गजाआड झाला आणि तो कणकवलीतील आहे असे पोलिसांचे म्हणणे असेल तर मग त्याचे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये ही एजंट असतील त्या एजंटांना आजपर्यंत पोलिसांनी का ताब्यात घेतले नाही याचे उत्तर तपासी अधिकाऱ्यांना निश्चितच द्यावे लागेल.
शिवाय सावंतवाडीच्या बॉबी बेग कडे जो तीन किलो गांजा सापडला तो गांजा तो कोणामार्फत सावंतवाडी तालुक्यात पुरवत होता याची माहिती अद्याप पर्यंत पुढे आली नाही,आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थाचे भले मोठे रॅकेट आहे त्यात परप्रांतीय महिला ,मुली ,कॉलेज युवक युवती,सामील असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे, आणि हे गांजा प्रकरण काही सावंतवाडीला नवीन नाही काही वर्षापूर्वी सावंतवाडी येथील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये युवकाच्या बॅगमध्ये गांजा सापडला होता तर शहराच्या स्थानिक नगरसेविका अनारोजीन लोबो यांनीही काही युवक-युवतींना गांजाची नशा घेताना पकडले होते, मात्र त्याचे पुढे काय झाले हे कुणाला समजले नाही, त्यामुळे या गांजा प्रकरणाची पाळेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरली आहेत व त्याचा म्होरक्या हा परप्रांतीय आहे असा आमचा संशय आहे ,सावंतवाडी शहरात अल्पावधीतच कोण करोडोंपती झाले, त्याने कोणत्या मार्गाने पैसा गोळा केला ,त्यांचा व्यवसाय काय?,याबाबतची संपूर्ण माहिती पोलिसांनी जमा केल्यास खरा सूत्र कोण तो शोधायला वेळ लागणार असे आमचे मत आहे, मात्र तपासातील प्रामाणिकपणा जिवंत असला तरच या गांजा प्रकरणातील खरे सुत्रधार सापडू शकतील नाही तर इतर प्रकरणात सारखे हे प्रकरण सुद्धा आता बंद होईल.
पोलीसांनी कोणालातरी येरागबाळ्याला पकडून आम्ही गांजा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पकडला असा आव आणला तरी सिंधुदुर्ग वासिये त्यावर विश्वास ठेवणार नाही याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे, जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्याकडे ह्या अवैद्य गांजा ,चरस, याचा मोठा साठा निश्चितच असेल याची आम्हाला खात्री आहे ,आणि ज्या वेळी त्यांच्या गांजाचे गोडाऊन पोलीस सील करतील त्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्‍या आवळतील त्याच वेळी पोलीसांनी प्रामाणिक तपास केला असे म्हणता येईल अन्यथा हे गांजा प्रकरण दिवसेंदिवस अधिक दुरवर शंका नाही म्हणूनच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जातीनिशी लक्ष घालावे वअशा समाजविघातक प्रवृतीला वेळीच ठेचून काढावे अशी आमची मागण
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!