पत्रकार अजय भाईप यांना गटशिक्षणाधिकारी वासुदेव नाईक यांच्या कडून मोबाईल जप्त करण्याची धमकी ….
_*🛑 पत्रकार अजय भाईप यांना गटशिक्षणाधिकारी वासुदेव नाईक यांच्या कडून मोबाईल जप्त करण्याची धमकी ….*_
_*🛑 गटविकास अधिकाऱ्यांच्या या कृत्याचा ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशन चे कोकण विभागीय अध्यक्ष व संपादक सीताराम गावडे यांनी केला निषेध*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-१२ :-* कास ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या अर्जदार प्रवीण पंडित राहणार कास यांनी या मीटिंग साठी पत्रकार अजय अर्जून भाईप यांना बोलावण्यात आले होते. परंतु हे उपस्थीत असुन दरम्यान मीटिंग सुरु असताना श्री भाईप हे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग घेण्याचे काम करत असताना गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी कोंकण लाईव्हब्रेकिंग चे कास प्रतिनिधि पत्रकार अजय भाईप यांना फोटो काढल्यास किंवा व्हिडिओ शूटिंग केल्यास मोबाइल जप्त करण्यात येईल. तसेच आपली परवानगी घ्या नंतरच फोटो किंवा व्हिडिओ शुट्टींग घ्या अशी धमकी दिली, तसेच व्हिडियो शुटींग आणि फोटो चोरून चोरुन काढत असल्याचा आरोप केला आहे.
प्रशासनाचा कारभार पारदर्शी असेल तर यांना पत्रकाराची भिती का वाटते असा सवाल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक व ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशन कोकण विभागीय अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केला असुन याविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग , जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, ग्रामविकास मंत्री यांच्या कडे करुन या मुस्कटदाबी विरुद्ध दाद मागणार असल्याचे सांगितले
यावेळी कास ग्रामपंचात सरपंच खेमराज भाईप , ग्रामसेवक राजेंद्र देसाई, कास पोलिस पाटील प्रशांत पंडित , आरोग्यसेवक श्रीवेटे,अर्जदार प्रवीण पंडित , ग्रामपंचायत सदस्य दिगंबर आळवे, निलेश पंडित, बाबू पंडित व आदि उपस्थित होते.