इन्सुली घाटीतील भुस्कलनामुळे धोकादायक बनलेली झाडे तोडण्यात यावीत अन्यथा मोठ्या दोरखंडाने बांधुन ठेवण्यात यावीत,ग्रां.पं.स.स्वागत नाटेकर यांची मागणी

इन्सुली घाटीतील भुस्कलनामुळे धोकादायक बनलेली झाडे तोडण्यात यावीत अन्यथा मोठ्या दोरखंडाने बांधुन ठेवण्यात यावीत,ग्रां.पं.स.स्वागत नाटेकर यांची मागणी

वनविभागाच्या अटकाना-भटकाना आणि लटकाना कारभाराचा फटका वाहनचालकांना

 

प्रतिनिधी-अंकुश नाईक

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली घाटीत गेल्या कित्येक वर्षांपासूनची रस्त्यालगत जुनाट झाडे आहेत,दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या झाडांची मुळातील माती वाहून जाऊन भुस्कलनाचे‌ प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्व झाडे उन्मळून पडण्याच्या ‌स्थितीत आहेत.काही झाडे जुनाट झाल्यामुळे मोडुन पडण्याची भिती आहे,घाटात कधी कुठले झाड कोसळेल याच्या भितीने वाहनचालक वाहन चालवत असतात,कित्येक वेळा वाहनांवर मोठ्या फांद्या तुटुन पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.वेळोवेळी स्थानिक(उत्कर्ष युवक मंडळाने)वनविभागाचा लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले आहेत असे नाटेकर यांनी सांगितले परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही वनविभागाकडून झालेली नसल्यामुळे स्थानिकांकडून आणि वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त ‌करण्यात येत आहे.यावेळी संबंधित विभागाचा अटकाना-भटकाना और लटकाना कारभार आपल्या लक्षात येतो,मृत्युचा सापळा बनलेली ही झाडे लवकरात लवकर तोडण्यात यावी अन्यथा मोठ्या दोरखंडाने बांधुन तरी ठेवण्यात ‌यावी‌‌ अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!