इन्सुलीतील कालव्याचे काम १५ वर्षे अपूर्ण राहण्यासाठी संबंधित अधिकारीच जबाबदार-स्वागत नाटेकर

 

सावंतवाडी, दि.१६:- इन्सुली कालव्याची परिस्थिती तशीच परिस्थिती सावंतवाडी-बांदा जुन्या हायवेची सुद्धा… ठेकेदाराने मंजूर झालेल्या रस्ता ४ लेअर मध्ये करण्याऐवजी मागील ३ वर्षे फक्त डागडुजी करुन धुळफेक ‌करण्याचे काम केले‌ आहे,त्यामुळे रस्ता अपूर्ण स्थितीत अधिकाऱ्यांची परिस्थिती अटकाना-भटकाना‌ और लटकाना अशीच आहे. अधिकाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगुन येत्या १५‌ दिवसांत इन्सुली-बांदा हायवेचे‌ अपूर्ण काम मार्गी लावा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन छेडण्याचा स्वागत नाटेकर यांनी इशारा दिला आहे.
इन्सुली तिलारी कालव्याच्या कामाला विलंब होण्यास संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत.या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशी विनंती इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी सरकारकडे केली आहे.शेतकरी वर्गाने बहुमोल अशा जमिनी कवडीमोल दराने तिलारी कालव्यासाठी दिल्या परंतु १५ वर्षे उलटली तरी कालव्याला पाणी आले नाही यासाठी पुर्ण जबाबदार संबंधित सरकारी अधिकारीच आहेत.अधिकारी आणि कंत्राटदार यांचे साटेलोटे असल्यामुळे कालव्याचे काम विलंबाने होत आहे.सरकारी अधिकारी अटकाना आणि भटकाना और लटकाना ह्या मानसिकतेचे झाल्यामुळे तिलारी कालव्याची ही अशी परिस्थिती उद्भवली आहे. येणाऱ्या १५ दिवसांत तिलारी कालव्याच्या पाण्याचा प्रवाह चालू करावा,आणि कालव्यामुळे उद्भवलेल्या समस्या दूर कराव्यात अशी विनंती इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी केली आहे.आणि या संदर्भात लेखी निवेदन सुद्धा तिलारी प्रकल्प अधिकारी यांना दोन वेळा देण्यात आले आहे.
सगळेच सरकारी अधिकारी याच पद्धतीने काम करताना दिसत आहेत, याचं दुसरं कारण म्हणजे जशी कालव्याची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आज रस्त्यांची सुद्धा झालेली आहे.माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार जुन्या सावंतवाडी-बांदा रस्त्याला कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा काम अजून पूर्ण झालेले नाही, सावंतवाडी ते इन्सुली-खामदेव नाका या रस्त्याची परिस्थिती बघता कंत्राटदाराने आपले काम अनेक ठिकाणी अपुर्ण ठेवल्याचे निदर्शनास येत आहे.३ वर्षांपूर्वी सावंतवाडी-बांदा हा रस्ता ठेकेदाराने करण्यास सुरुवात केली होती, संबंधित शासन नियमानुसार ४ लेअर मध्ये हा रस्ता पुर्ण करायचा होता परंतु मागील ३ वर्षांत हा रस्त्या अनेक ठिकाणी अर्धवत ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.मंजुर झालेली कामे तरी ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांनी करुन घेतली ‌पाहिजे.मागील ३ वर्षात ठेकेदाराने फक्त दागदुजी करण्याचे काम केले आहे,साधले वडापाव सेंटर ते इन्सुली-खामदेव नाका या अंतरात शासनाची रक्कम खर्च झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे,मात्र‌‌ या रक्कमेतुन रस्ता पुर्ण केलाच नाही ‌केवळ‌ धुळफेक ‌करण्याचे काम केले आहे,याला सुद्धा ठेकेदार आणि शासकीय अधिकारी जबाबदार आहेत.याठिकाणी सुद्धा अटकाना-भटकाना और लटकाना अशीच परिस्थिती आहे.सरकारी अधिकाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगुन येणाऱ्या १५ दिवसांत सावंतवाडी ते बांदा रस्त्याचे अपूर्ण काम पुर्ण न केल्यास १ मे रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम ‌विभागासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!