राजापूरातील भाजपा पदाधिकाऱ्यांमार्फत चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत..

राजापूर भाजपा पदाधिकाऱ्यांनी मार्फत चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत..

प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

राजापूर दि.२ ऑगस्ट :-

भारतीय जनता पार्टी राजापूरचे व रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक, त्यांचे सहकारी व भाजपा पदाधिकारी यांच्या तर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना वस्तू रुपी मदत करण्यात आली आहे.

फॅन्ड्री फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉक्टर शुभम कुशे व त्यांचे सहकारी यांच्याकडे ही वस्तूरुपी मदत सुपूर्त करण्यात आली. फॅन्ड्री फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वे करून ज्या पूरग्रस्तांना अद्याप प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही अशांना या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. या वस्तू रुपी मदतीमध्ये टॉवेल, गाऊन्स, ब्लॅंकेट, फीनेल, सॅनिटरी पॅड्स इत्यादी वस्तू अंतर्भूत आहेत.

या मदतीमध्ये अनिलकुमार करंगुटकर यांच्यासह स्वप्नील गोठणकर, महादेव गोठणकर, सिराज साखरकर, नगरसेवक गोविंद चव्हाण, सुनील भणसारी, रविकांत रुमडे, शीतल पटेल, रसिका कुशे, सुधा चव्हाण इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!