चांदा ते बांदा योजनेतून झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार;१५ आँगस्टला करणार उपोषण

*_चांदा ते बांदा योजनेतून झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार;१५ आँगस्टला करणार उपोषण_*

*_नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा_*

*🎴सावंतवाडी,दि.०२-:* चांदा ते बांदा योजनेतून सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील तसेच आंबोली येथील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे याबाबत संबंधित यंत्रणेकडे वारंवार चौकशीची मागणी करून देखील अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १५ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी पत्रक दिले असून त्यात असे म्हटले की युती सरकारच्या काळात आमदार दीपक केसरकर पालकमंत्री असताना चांदा ते बांदा ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती मात्र या योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजू परब यांनी प्रसिद्ध पत्रकातून केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!