आर आर पी सी एल कंपनीकडून राजापूर नगरपरिषदेला रुग्णवाहिका प्रदान
आर आर पी सी एल कंपनीकडून राजापूर नगर परिषदेला रुग्णवाहिका प्रधान
प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
राजापूर दि.२ ऑगस्ट
रत्नागिरी ग्रीन रिफायनरी कंपनीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला तालुक्यामधून दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून आर. आर. पि. सी. एल. कंपनीकडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली. नगराध्यक्ष जमीर खलीफे यांच्याकडे चैतन्य ट्रस्टचे संचालक विश्राम परब यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी प्रदान करण्यात आली.
शहरातील मुख्य चौकात झालेल्या या समारंभाला काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे, नगरसेवक गोविंद चव्हाण, सुलतान ठाकूर, स्नेहा कुवेसकर, तसेच रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. शशिकांत सुतार, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, आर. आर. पि. सी. एल. कंपनीचे पी. आर. ओ. अनिल नागवेकर, चैतन्य ट्रस्टचे प्रशांत गांगण, सीए निलेश पाटणकर, इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनचे मॅक्सी पिंटो, नॅशनल असोसिएशन ऑफ इंडियन ऑइल एम्प्लॉईजचे मदन खामकर इत्यादींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
राजापूर नगर परिषदेला कंपनीने मोफत सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी कंपनीचे आभार मानले आहेत. राजापूर शहरातील नागरिकांना या रुग्णवाहिकेची सेवा मोफत दिली जाणार असून यासाठी नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन खलिफे यांनी केले आहे.