पुरामध्ये नुकसान झालेल्या बांद्यामधील व्यापाऱ्यांची शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी भेट घेत परिस्थितीचा घेतला आढावा
बांदा,दि.२६:- २ दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती,सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यात बांदा बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे बेकरी व्यवसायिक,मोबाईल व्यवसायिक,किराणा माल दुकानदार सर्वच व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी बांदा बाजारपेठेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांची भेट घेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर संबंधित प्रशासन तहसीलदार, गटविकास अधिकारी, बांदा पोलिस निरीक्षक यांच्याशी एकत्रित बैठक घेऊन झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा केली याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली असून नुकसानभरपाई बाबत पालकमंत्री सुद्धा सकारात्मक निर्णय घेतील व नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करतील असा विश्वास तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.यावेळी बांदा शहरप्रमुख साई काणेकर,अजित सांगेलकर, चंद्रकांत कासार,भैय्या गोवेकर आदी उपस्थित होते.

