नेतर्डे येथील केंद्रावर काजू खरेदीला सुरवात.
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा : शेतकरी सगळ्यात जास्त रिस्क घेऊन पीक घेत असतो सद्यस्थितीत लहरी निसर्गामुळे शेतकऱ्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे अश्या प्रसंगी शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं कोणाच सहकार्य मिळत नाहीत तसेच शेतमालाच्या किमती ठरविण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शनाळ मिळत नाही.त्यासाठी सावंतवाडी दोडामार्ग मधील शेतकऱ्यांनी जो शेतकरी फळबागायतदार संघ स्थापन केला त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहील पाहिजे.संघाच्या कामात हिशोबाची पारदर्शकता असल्यास शेतकरी नक्कीच एकत्र येतील असे प्रतिपादन विदर्भ कोकण ग्रामीण बँक कळणे शाखेचे व्यवस्थापक कृष्णाजी कोठावळे यांनी नेतर्डे येथे केले
ते शेतकरी व फळबागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्गच्या वतीने आज पासून नेतर्डे येथील केंद्रावर काजू खरेदी सुरवात केली .त्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच प्रशांत कामत, संघाचे अध्यक्ष विलास सावंत, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सचिव सौरभ सिद्धये, नितीन मावळणकर, विलास गवस, जगदेव गवस, शेतकरी, संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते
सुरवातीच्या दोन तासातच सुमारे साडे नऊ टन काजू विक्री परिसरातील शेतकऱ्यांनी विक्री केली आहे.काजूला प्रतिकिलो 140 रुपये दर देण्यात आल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.तर येत्या काळात दिवस ठरवून प्रत्येक गावात येऊन रोखीने काजू खरेदी करणार असल्याचे यावेळी संघाच्या वतीने सांगण्यात आले.तर दिवभरात चाळीस टनहुन अधिक काजू खरेदी करण्यात आली.
यावेळी संघाचे अध्यक्ष विलास सावंत म्हणाले शेतकऱ्यांना थेट कारखानदारापर्यंत घेऊन जाण्याचे काम आमच्या मार्फत करण्यात येणार आहे. एक किलो काजू पीक घेण्यासाठी सुमारे 122 रुपये खर्च येतो आणि त्याला बाजारात 130 ते 140 रुपये दर मिळतो त्यामुळे तो शेतमाल थेट कारखानदाराने खरेदी केल्यास आम्हांला अजून फायदा होईल त्यासाठी आमची धडपड आहे.येत्या काळात आम्ही अजून जास्तीत जास्त दर मिळण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी आम्ही एक संघ राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपसरपंच प्रशांत कामत, जगदेव गवस यांनी मार्गदर्शन केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गावडे यांनी तर आभार सौरभ सिधये यांनी मानले. यावेळी कृषी विभागाचे यशवंत सावंत, श्वेता सावंत, अतुल माळी ,ज्योती पवार, विश्वनाथ शिवपुरे, एस ए सरगुरु आधी उपस्थित होते. काजू खरेदीला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

