गांजा प्रकरणातील म्होरक्या सावंतवाडीतील……!!!! तिघे ताब्यात -दोघांना पोलीस कोठडी, तर मुख्य सुत्रधार फरार
*सावंतवाडी दि,२४-:* सावंतवाडी ते वेंगुर्ले अशी गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने आकेरी घाटी येथे सापळा रचत ११ हजार रुपये किमतीचा ३६७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी सावंतवाडीतील मयुरेश गुरुनाथ कांडरकर,वय १९ या भटवाडी दत्तमंदिर जवळ सावंतवाडी,आशिष अशोक कूलकर्णी सालईवाडा मुळ कोल्हापूर,दोघा युवकांना अटक करून ताब्यात घेण्यात आले होते.
शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा कुडाळच्या वतीने करण्यात आली.
सावंतवाडी ते आकेरी मार्गे असा गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या विभागाचे पोलिस उपनिरीक्षक एस . एन देसाई ,पोलीस हवालदार कोयंडे, कदम ,बी .पी गावडे व नार्वेकर यांनी आकेरी घाटी येथे सापळा रचला या ठिकाणी आलेली मारुती सुझुकी टू व्हीलर थांबवू यावरील दोघांची व गाडीची झाडाझडती घेत गाडीच्या डीकित गुलाबी रंगाच्या एका कापडी पिशवीत दुसरी एक गुलाबी रंगाची प्लास्टिक ची पिशवी होती ही पिशवी तपासल्यावर त्यात गांजा सदृश्य वस्तू आढळली.
याबाबत दोघांनाही पोलिसांनी विचारल्यावर तो गांजा असल्याचे सांगितले .या गांज्याचे वजन ३६७ ग्रॅम असून ११हजार किमंतीचा आहे. यावेळी ८० हजार रु मारुती सुझुकी टू व्हीलर व एक मोबाईल जप्त करण्यात आला..तर यातील तिसरा संशयित आरोपी अतुल उमेश गवस वय २३ रा खासकीलवाडा याला पकडले आहे तर गवस याने बेग याचा पत्ता दिला पोलिस बेग यांच्या घरी पोहचण्या अगोदर बाँबी उर्फ फैजल बेग रा.बाहेरचा वाडा हा युवक फरार आहे,त्याचा घराची झाडाझडती घेतल्यावर ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.त्याला ताब्यात घेतल्यावर अख्ख रॅकेटच जेरबंद होणार आहे. गांजा प्रकरणात मोठ मोठे व्यक्ती असल्याचे चर्चा सुरू असून मोठी नाव पुढे येण्याची शक्यता आहे. न्यायालयात आरोपी विरोधात फिर्याद प्रमोद काळसेकर यांनी दिली.