नवलराज विजयसिंह काळे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली युवक आघाडीच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवड

नवलराज विजयसिंह काळे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली युवक आघाडीच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवड
महासंघाच्या ऑनलाईन सभेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली घोषणा

वैभववाडी प्रतिनिधी
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे युवा नेते नवलराज काळे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यकाल 23 जुलै 2021 रोजी संपत असल्यामुळे महासंघाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीस गेले दोन दिवस चालू असलेल्या तुफानी पावसामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना महासंघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली व महासचिव नयन सिध यांनी या संकटात अडकलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या समाज बांधवांना महासंघातर्फे सहकार्य करावे, शासनाकडून मदत होण्यासाठी आपापल्या भागात पाठपुरावा ही करावा व त्यांना मदत पोहोचवावी असे आवाहन करून सभेस सुरुवात करण्यात आली. या सभेत समाज बांधव व पदाधिकारी यांच्या साक्षीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीणजी काकडे यांनी कोकणचे युवा नेते श्री नवलराज विजयसिंह काळे यांच्या गेले सहा वर्षाच्या कार्याचा आढावा घेत दिल्ली येथील प्रधान कार्यालयाला यांच्या पदाबाबत ची शिफारस केली होती व काही दिवसांपूर्वी दिल्लीत या शिफारशी वर शिक्कामोर्तब झाला होता.23 जुलै 2021 रोजी आयोजित ऑनलाईन सभेमध्ये प्रवीणजी काकडे साहेब यांनी श्री नवलराज विजयसिंह काळे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवड करीत असल्याचे जाहीर केले. तशा प्रकारचे पत्र देखील प्रवीण काकडे यांनी काळे यांना पाठवले आहे.प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी निवड पत्रात म्हटले आहे की, धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी आपण ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे समाजात एकनिष्ठेने गेले अनेक वर्षे काम करीत आहात. आपण महासंघाच्या माध्यमातून वैभववाडी तालुका सदस्य, तालुका अध्यक्ष व तीन वेळा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचे हित जोपासण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिला, आपल्या या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो धनगर समाजाच्या संवर्धन आणि समाज हिताचे रक्षण व्हावे या हेतूने राष्ट्रीय पातळीवरून पोटशाखा भेद, प्रांत भेद, भाषाभेद बाजूला ठेवून सर्व धनगर समाज एक होत आहे. आपल्या कार्याची दखल घेत या राष्ट्रीय प्रवाहात आपणास सहभागी करून घेऊन आपल्या आजपर्यंतच्या समाजसेवेचा यथोचित गौरव करावा व आपणास आणखी विस्तारित क्षेत्र उपलब्ध व्हावे. या हेतूने आपली ऑल इंडिया धनगर समाज महासंघ युवक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्षपदी निवड करीत आहोत सदरील पदाचा कार्यकाल एक वर्षाचा राहील सदर पदावर उत्कृष्ट काम करून महासंघाने व समाजाने आपल्यावर टाकलेल्या विश्वासास व आदरास आपण तडा जाऊ देणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत नियुक्तीबद्दल प्रवीण काकडे यांनी काळे यांचे अभिनंदन केले आहे. कोकण धनगर समाजाचा विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे समाज संघटना एकत्र येऊन महासंघाला सहकार्य करून महासंघाच्या कार्याला बळ द्यावे व नवलराज काळे यांनी कोणताही भेदभाव न करता समाजात राजकारण न आणता समाजहिताचे काम करून कोकणातील धनगर समाजाला न्याय द्याव असे सांगितले. या पदाचा काळे यांनी उपस्थित समाजबांधवांच्या साक्षीने स्वीकार करत महासंघाच्या माध्यमातून कोकण मध्ये मोठं संघटन उभं करून समाजाला प्रामाणिकपणे न्याय देऊ. लवकरच कोकणची कार्यकारणी जाहीर करून महासंघात जोमाने काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा योग्य संधी देत सिंधुदुर्ग जिल्हा सहित कोकण मध्ये येणारे सर्व जिल्ह्या मध्ये महासंघातर्फे समाजाचे मजबूत संघटन करून समाजकार्यात अविरतपणे कार्यरत राहू असे सांगत कोकण प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल महासंघाचे मार्गदर्शक होळकर घराण्याचे मामे वंशज अमरजीत राजे बारगळ साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे साहेब व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीसहित दिल्ली व राष्ट्रीय कार्यकारणीचे व आतापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे समाज बांधवांचे आभार मानले. त्यावेळी उपस्थितांनी काळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सभेला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे , प्रदेश महासचिव नयन सिंद, प्रदेश महा संघटन मंत्री दयानंद ताटे, पुणे जिल्हा मीडिया प्रमुख लक्ष्मण बोडेकर,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विजय कोकरे,जिल्हा युवक अध्यक्ष नवलराज काळे,युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले,युवा जिल्हा सह सचिव बापू खरात,युवा जिल्हा संपर्क प्रमुख हर्षद फाले,युवा जिल्हा संघटक अनिल कोकरे व मंगेश झोरे,जिल्हा कार्यकारणी सदस्य रमेश खरात, मालवण कुडाळ विधानसभा अध्यक्ष दीपक कोकरे,मालवण कुडाळ विधानसभा संपर्क प्रमुख दशरथ वरक, मालवण तालुका अध्यक्ष मंगेश शिंगाडे,युवा तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे, वैभववाडी तालुका मीडिया प्रमुख अनंत फोंडे, युवा अध्यक्ष कुडाळ धुळू वरक,युवा उपाध्यक्ष सत्यवान येडगे समाजसेवक धाकु (D.K.) खरात कणकवली,सोनुजी शेळके वैभववाडी,संजय शिंगाडे,जे.आर.माने, विठ्ठल शिंदे कुडाळ, पी. बी.जंगले मालवण, दीपक येडगे कुडाळ,सिताराम बावदाने,पांडुरंग शिंदे,गणेश झोरे आदी मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!