कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराचा शेतकऱ्यांना फटका..

मागील वर्षी अतिवृष्टी मुळे झालेल्या भातपीक नुकसानीची मदत मिळण्यापासून जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अजूनही वंचित..

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा न झाल्यास मनसे करणार तीव्र आंदोलन; तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०९: मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुरसदृष्य परिस्थिती उद्भवून शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. सदर नुकसानीबाबत राज्यपाल महोदयांनी हेक्टरी आठ हजार रुपये नुकसान भरपाई रक्कम जाहीर करुन प्रस्ताव करणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात संबंधित गावचे ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या संयुक्त समितीने पंचनामे करून शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून देखील घेतली होती. त्यामधील तलाठ्यांकडून जे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे ३१ मार्च २०२० पूर्वी सादर झाले ते मंजूर होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आली परंतु प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात  काही गावांमधील तलाठ्यांनी कामात दिरंगाई करून अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव आपल्याच ताब्यात ठेवून विहित वेळेत संबंधित तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केले नसल्याने अद्यापही बहुतांश शेतकरी भात पीक नुकसान भरपाई रक्कम  मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. एकीकडे शासनाकडून शेतकऱ्याना नुकसानीपोटी अत्यल्प मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा हिरमोड केला तर दुसरीकडे कामचोर कर्मचाऱ्यांनी बेजबाबदार पणा दाखवत शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराकडे जिल्हाधिकऱ्यांचे लक्ष वेधणार असून कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईची मागणी करणार आहे. सद्यस्थित कोरोना आपत्तीमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था व चालू हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याचा विचार करता  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे आगामी दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भात पिकात नुकसानीची रक्कम जमा न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलनाचा पवित्रा हाती घेईल अशी माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!